खटाव:-साखरवाडी:-(खामगाव) येथे ३ तारखेला गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
साखरवाडी:-(खामगाव) येथे ३ तारखेला गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.
मायणी प्रतिनिधी___साखरवाडी खामगाव येथे तीन रोजी सोमवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे भव्य आयोजन केले असल्याची माहिती महंत सद्गुरु उमेशानंद महाराज यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की या धार्मिक कार्यक्रमासाठी थानापती महंत सहजानंद सरस्वती, महाराज उपस्थित राहून गुरुपदेश करणार आहेत तसेच यावेळी अक्षय ब्लड बँक पुणे व स्वयंभू दत्त सेवा मंडळ साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे रक्तदान करणाऱ्या दात्याला बक्षीस देण्यात येणार आहेत तसेच मानव विकास सेवा मंडळ पिंपोडे बुद्रुक व बुद्रराणी आणि हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच यावेळी आश्रम शाळेतील मुलांना त्यांचे ड्रेस व भोजन देण्यात येणार आहेतरी भाविक भक्तांनी रक्तदात्यांनी शिबिरात उपचार करून घेणाऱ्या ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन स्वयंभू दत्त सेवा मंडळ साखरवाडी खामगाव यांनी केले आहे.