कराड:-कराड तहसील कार्यालय समोर वाघेरी सरपंच व ग्रामस्थ यांच्याकडून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाबाबत उपोषण.
प्रतिनिधी सौरभ चव्हाण:-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
आज कराड तहसील कार्यालय समोर वाघेरी सरपंच व ग्रामस्थ यांच्याकडून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाबाबत उपोषण सुरू होते.त्यांच्या मागण्या समजून घेवून उपोषण मागे घेण्यात आले.
मौजे वाघेरी फाटा ते वाघेरी पर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण काम गेले दहा ते पंधरा वर्षापासून प्रलंबित आहे. ग्रामपंचायतने मागणी असून सुद्धा सदर कामावर दुर्लक्ष केले गेले असता प्रत्येक वेळेस स्थानिक लोकप्रतिनिधीनी सदर कामासंदर्भात फक्त आश्वासन देण्यात आले. वाघेरी फाटा ते वाघेरी हा रस्ता होण्यासाठी सरपंच व वाघेरी गावचे ग्रामस्थ उपोषणास बसले होते. या उपोषणस्थळी कराड उत्तर भाजपचे नेते श्री. धैर्यशीलदादा कदम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गावाकऱ्यांच्या समस्या समजून घेवून माण खटावचे आमदार माननीय श्री.जयकुमार गोरे भाऊ यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. भाऊंनी सदर काम लवकर करून देण्याचे आश्वासन दिले. कराडचे तहसीलदार पवार साहेब यांना निवेदन देवून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि धैर्यशीलदादा कदम यांचे आभार मानले.