आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-निगडीत ज्येष्ठांकरीता आनंदी जीवन मार्गदर्शन मेळावा.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

निगडीत ज्येष्ठांकरीता आनंदी जीवन मार्गदर्शन मेळावा.

पिंपरी, दि. १५ (शफीक शेख):-प्राधिकरण मधील सेक्टर 27अ येथील कृष्णा सहकारी गृह रचना संस्था हॉलमध्ये शनिवारी 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत ‘ज्येष्ठांकरीता आनंदी जीवन मार्गदर्शन मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक “आनंदी मार्गदर्शन मेळावा” घेणार आहेत. सदर मार्गदर्शन मेळाव्यामध्ये ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या विविध समस्याचे निराकरण तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक प्रश्नोत्तराच्या कालावधीत त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून शंका निरसन केले जाणार आहे.
यावेळी पोलीस अधिकारी, अध्यक्ष- बाबुराव फडतरे, सचिव- अनिल चव्हाण, इतर सदस्य व नागरिक उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निराकरणासाठी तसेच आनंददायी, सुरक्षित आणि निश्चिंत आयुष्य जगण्यासाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून आनंदी मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णा सहकारी संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button