पुणे आकुर्डी:-बीना शाळेलगतच्या अगरबत्तीच्या कारखान्यास अचानक आग; 400 विद्यार्थी सुखरूप.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
बीना शाळेलगतच्या अगरबत्तीच्या कारखान्यास
अचानक आग; 400 विद्यार्थी सुखरूप.
आकुर्डी, दि. 06 (शफिक शेख):- येथील बीना इंग्लिश मिडियम शाळेलगत असलेल्या रियल फ्रेग्रेन्स प्रा. लिमिटेड या अगरबत्ती बनविणा-या कंपनीस आज रोजी अचानक आग लागली. यावेळी अंदाजे 5 ते 6 सिलिंडरचे स्फोट झाल्याचे पाहण्यात आले. आगीचे कारण अद्यापर्यंत समजू शकले नाही. आग लागलेली कळताच निगडी पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ त्यांच्या पूर्ण ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. बीना इंग्लिश मिडियम शाळेतील सुमारे 400 विद्यार्थ्यांना मोठया मेहनतीने पोलीस, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्यास हानी पोहोचली नाही. आग लागलेली कळताच विद्यार्थ्यांचे पालक आणि परिसरातील नागरिक यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत केली.
सुमारे 9 ते 10 अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहायाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु आज या दुर्घटनेच्या माध्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदर अगरबत्ती उत्पादक कंपनी आणि शाळेच्या सिमाभिंतीची उंची यामध्ये फार फरक नसल्याने मोठी हानी होता होता राहिली. तरी या दुर्घटनेनंतर तरी शाळा प्रशासनाने सुमारे 400 विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतची सर्व काळजी घेण्याची गरज असल्याचे पालक आणि नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. सदर कंपनी आणि शाळा यामधी सीमाभिंत ही अधिक उंच आणि मजबूत करण्यात गरजही नागरिकांनी बोलवून दाखविली. शाळा व्यवस्थापनाने शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या सर्व सुरक्षिततेविषयीच्या नियमांचे पालनही अत्यंत काटेकोरपणे करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.