पुणे पिंपरी:-काळेवाडी येथील 3148 चौ.मी. क्षेत्राचे अनधिकृत बांधकाम पाडले.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
काळेवाडी येथील 3148 चौ.मी. क्षेत्राचे
अनधिकृत बांधकाम पाडले.
पिंपरी, दि. 06 (शफिक शेख):- काळेवाडी येथील 6 आरसीसी आणि 7 पत्राशेड असे मिळून एकूण 3148 चौ. मी. क्षेत्राचे अनधिकृत बांधकाम आज रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय यांनी संयुक्तिक कारवाईने पाडण्यात आले.
सदर कारवाई अति. आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मकरंद निकम यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती सोनम देशमुख, आबासाहेब ढवळे, विनायक माने, सुशिलकुमार लवटे, कनिष्ठ अभिंता व ब येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच 20 मनपा पोलीस कर्मचारी, वाकड पोलीस स्टेशनचे 2 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक, 10 पोलीस कॉन्स्टेबल, महाराष्ट्र पोलीस सुरक्षा बलाचे 26 कर्मचारी यांच्या सहायाने 3 जेसीबी आणि 10 मजूर यांच्या मदतीने करण्यात आली.