कणकवली:-कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ॲड.उमेश सावंत यांची नियुक्ती.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ॲड. उमेश सावंत यांची नियुक्ती.

॥ कणकवली : मुंबई उच्च न्यायलयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मोफत विधी सेवा समितीच्या पॅनलवर सिंधुदुर्ग जिल्हयातून अॅड. उमेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्यामार्फत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्मित मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील
सर्किट बेंचसाठी विधी, सेवा समितीमार्फत गरजूंना मोफत विधी सेवा पुरविण्यासाठी नुकतीच विधिज्ञांची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्गमधून अॅड. उमेश सावंत यांची दिवाणी, फौजदारी व महसुली कामांसाठी पॅनलवर निवड करण्यात आली आहे.
या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोरील खटल्यांसाठी विधी सेवा समिती त्यांची नियुक्ती करू शकणार आहे. तसेच कोल्हापूर सर्किट बेंचसाठी तज्ज्ञ मध्यस्थ म्हणून निवृत्त न्यायाधिशांसोबत देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




