सातारा जावळीत विना ठेकेदार- विना बॅनर ठिकाणी शत प्रतिशत कमळ ….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जावळीत विना ठेकेदार- विना बॅनर ठिकाणी शत प्रतिशत कमळ ….
सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने महायुती भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाचव्यांदा आमदारकी चालून आलेले आहे. यामध्ये ५३ ठिकाणी शतप्रतिशत कमळ फुलले आहे. ज्या परिसरात विना ठेकेदार- विना बॅनर प्रचार झालेला आहे. क्या भाबड्या मतदारांनी आमदार भोसलेंना समर्थ साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा जावळी विधानसभा मतदारसंघांमध्ये गेले वीस वर्ष सातत्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संपर्क ठेवला. व्यक्तिगत पातळीवर विरोधकांना सुद्धा सन्मानित केले. त्याची फक्त पोहच पावती नसून संपूर्ण पुस्तकच मतदारांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या ताब्यात दिलेले आहे. आमदार भोसले यांना १ लाख ७६ हजार ८४९ व त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे अमित कदम यांना ३४ हजार ७२५ मते मिळाली. या ठिकाणी १ लाख ४२,१२४ मताधिक्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विजयी झालेले आहेत. यासाठी २४ फेऱ्यापर्यंत त्यांना मताधिक्य वाढल्याचा सुखद धक्का बसलेला आहे. मात्र ,२३८१ मतदारांनी उमेदवार पसंद नाही. या नोटालाही मतदान केलेले आहे. नोटाला मतदान करणारे पारंपारिक पक्षीय निष्ठावंत दिसत आहेत.
महाविकास आघाडी व महायुती ला पर्यायी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे बबन करडे यांना अवघे २७७२ मते पडलेले आहेत. या ठिकाणी आठ उमेदवार होते. पैकी तीन मतदार हे चार आकडी संख्या गाठू शकले तर उर्वरित मतदारांना चार आकडी संख्या काढता आलेली नाही. ठेकेदारी हा प्रचाराचा मुद्दा मुद्दा उपस्थित करून या निवडणुकीमध्ये लक्षवेधी प्रचार यंत्रणा राबवण्यात आली होती. परंतु , भाजपचे कर्तबगार आ. भोसले व श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले या दोन बंधूंवर पुरी पूर्ण विश्वास दाखवण्यात आला. नवलाईची गोष्ट म्हणजे सातारा जावली विधानसभा मतदारसंघांमध्ये ५३ ठिकाणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधकांना दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. या ठिकाणी कोणताही ठेकेदार अथवा बॅनर बाजी झालेली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने भोसले कुटुंबीयांचा व्यक्तिगत करिष्मा दिसून आलेला आहे.
जावळी तालुक्यातील हातगेघर मुरा, बोंडार वाडी, आटाळी, धावली, वेणखोल, मोरबाग मतदान केंद्रात विरोधकांना शून्य मते मिळाली. भुतेघर मुरा, भांबवली, दिवदेव, केळवली, रायघर, म्हाते मुरा, पवनगाव, मोरेवाडी, मांटी, खिरखिंडी, पेट्री या ठिकाणी विरोधकांना एक मते प्राप्त झाले आहे. वाहिटे , आश्टे, आणि जगमीन या ठिकाणी फक्त तीन मते विरोधकांच्या वाट्याला आलेले आहेत. तशीच परिस्थिती रेगडी वाडी, पळसवडे, कावडी, सायघर, वावदरे, अनवळेवाडी, बामणेवाडी, मुरडमुरे, जांभे, बोपोशी, कुंभारगणी, धनवडेवाडी, रकुसले वाडी, कास, कारगाव भेंडेवाडी, खडगाव नरफदेव, मापरवाडी पारंबेवाडी, गोगावलेवाडी, अंबनी, पाटेश्वर, जांभूळमुरे या गावातही कमळ सोडून विरोधकांचे पानिपत झालेले आहे. ४६४ मतदान केंद्रामध्ये ५३ ठिकाणी दोन आकडी संख्याही हा विरोधी उमेदवारांना गाठता आलेली नाही. या ठिकाणी महायुती अथवा महाविकास आघाडीच्या कुणीही ठेकेदार अथवा समर्थकांनी बॅनर बाजी केली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने सातारचे भाजप खासदार व आमदार यांनी ठेवलेल्या संपर्कामुळेच महाराष्ट्रामध्ये सातारा जावळी मतदारसंघाची चर्चा रंगू लागलेली आहे. मोठमोठ्या गावांमध्ये तसेच सातारा शहर व उपनगर मतदान केंद्रात बॅनरबाजी व ठेकेदारांची फौज असून सुद्धा विरोधकांना लक्षणीय मते पडलेली आहेत. या उलट डोंगर-कडा कपाऱ्यातील लोकांनी भाजपच्या कमळ चिन्हाला निस्वार्थीपणाने मोलाची साथ दिलेली आहे. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
सातारा व जावळी तालुक्यातील प्रमुख ठिकाणी जागोजागी आमदार भोसले यांच्या अभिनंदनचे बॅनरबाजी जेवढ्या प्रमाणात दिसत आहे. तेवढ्याच प्रमाणात विरोधकांना सुद्धा मतदारांनी मतदान केले आहे. हे आता लपून राहिलेले नाही. हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ते व मतदारांची भूमिका लक्षात ठेवूनच पाच वर्ष आमदार भोसले यांनी काम करावे अशी मागणी होऊ लागलेली आहे.
——————————————