खटाव:-मायणी येथील 24 बाय सात पाणी योजनेच्या प्रत्यक्ष कामास आठ दिवसात सुरुवात.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मायणी येथील 24 बाय सात पाणी योजनेच्या प्रत्यक्ष कामास आठ दिवसात सुरुवात.
मायणी प्रतिनिधी मायणी येथील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या 24 बाय सात योजनेच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ येत्या येत्या आठ दिवसात होणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या पद्म रचना. इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की पद्मरचना कंपनीचे ठेकेदार ए ए पाटील व डी व्ही रेडेकर यांनी खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर व सरपंच सचिन गुदगे यांची भेट घेऊन ही माहिती दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर हे काम चांगले झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी दुसरी कंपनी येणार आहे त्यामुळे हे काम अतिशय मजबूत होणार असून पाण्याच्या पाईप लिकेज होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे याबाबत बोलताना डॉक्टर दिलीपराव येळगावकर म्हणाले की सन 2018 मध्ये तत्कालीन मंत्री बबनराव लोणीकर यांनी हा प्रस्ताव मंजूर केला होता मध्यंतरी युवा नेते सचिन गुदगे व माजी आमदार बसवराज पाटील यांनी या योजनेला गती दिली त्यामुळे सन 2022 मध्ये हे काम सुरू होत आहे ही. मायणी कराच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे मायणी येथे ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्यावर उभारल्या जाणार आहेत तेथील भूगर्भाची चाचणी पूर्ण झाली असून त्यासाठी लागणाऱ्या पाईपची ऑर्डर ही दिली गेली आहे येथे आठ दिवसात पाण्याच्या टाकीच्या जागेवर खुदाई होणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे यासाठी शासनाच्या तांत्रिक टीमकडून वेळोवेळी सूचना आम्ही घेऊ असेही पद्मरचना कंपनीचे ठेकेदार ए ए पाटील व डीव्ही रेडेकर यांनी सांगितले.