वाई:-क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट वाई तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट वाई तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

आम्ही तुमच्या सोबत आहोत.. असे म्हणायलाही मनाचा मोठेपणा असावा लागतो; त्यांतून मिळणारा आधार, उमेद अन् विश्वास ,नैराश्य दूर करण्याचे फारच मोठं काम करतों…!! आणि काम करण्याची ऊर्जा मिळते.
आज याचा प्रत्यक्ष अनुभव आला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपालिका शाळा क्रमांक 7 फुलेनगर वाई या शाळेतील विद्यार्थ्यांना आज क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट वाई यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, लेखनाचे साहित्य इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राप्त झालेल्या साहित्यातून नक्कीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात त्यांच्या गुणात्मक विकास होईल.क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी शिक्षणाची बीजे या महाराष्ट्राच्या मातीत रोवली . त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवताना कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी सदैव तत्पर असणारे क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट वाई यांच्या सर्व कार्यकारिणीचे मनापासून आभार मारण्यात आले.




