पुणे भोसरी:-रॅपिडो’ विरूद्ध गुन्हा दाखल.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
‘रॅपिडो’ विरूद्ध गुन्हा दाखल.
भोसरी, दि. 29 (शफिक शेख):- रोपन ट्रान्स्पोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (रॅपिडो) या कंपनीविरोधात बाईक टॅक्सी या संवर्गात कुठल्याही प्रकारचा वैध परवाना नसताना बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करवून घेतल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 418, मोटार वाहन कायदा कलम 66, 192 (अ), 93, 193, 146, 197 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 2000 चे 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सहा. पोलीस निरीक्षक पांचाळ हे पुढील तपास करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तानाजी शिवाजी धुमाळ हे मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड या पदावरील अधिकारी आहेत त्यांनी रोपन ट्रान्स्पोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (रॅपिडो)च्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, सदर कंपनीस महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी या संवर्गात फेब्रुवारी 2021 पासून आजपर्यंत कोणताही परवाना/लायसन्स दिलेले नाही. तरीही या कंपनीने पिंपरी-चिंचवड परिवहन विभागात रॅपिडो हे बाईक टॅक्सी विनापरवानगी बेकायदेशीर ऑनलाईन अॅप सुरू करून सदरचे अॅप हे कायदेशीर असल्याचे दुचाकी वाहन चालकांना भासवून त्यांची फसवणूक केली आणि या बेकायदेशीर अॅपच्या माध्यमातून त्यांच्याकडून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करवून घेतली. याबाबत वरील सर्व कलमान्वये रॅपिडो कंपनीविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.