आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

छ.संभाजीनगर:-मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार.

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार.

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी १७ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे रविवारी शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. डॉक्टरांच्या पथकांनी त्यांच्या विविध तपासण्या करून त्यांना आंतररुग्णविभागात दाखल करुन घेतले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा बांधवांनी आमरण उपोषण केले. हे आंदोलन चिरडण्यासाठी पेालिसांनी त्यांच्यावर लाठी हल्ला आणि गोळीबार केला होता. यात अनेक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झालेले आहेत. या आंदोलकांवर शहरातील उल्कानगरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१७ दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे यांचे वजन सुमारे सात ते आठ किलो कमी झाले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबई येथे उपचारासाठी येण्याचे सांगितले होते. तेव्हा त्यांनी माझे गावकरी जेथे ॲडमिट आहेत, त्या हॉस्पिटलमध्येच मी उपचार घेतो, असे सांगितले होते. त्यानुसार जरांगे काल दुपारी १ वाजता या रुग्णालयात दाखल झाले.

यावेळी पोलीस सरंक्षणात आलेल्या जरांगे यांच्यासोबत त्यांचे भाऊ नवनाथ जरांगे, पुतणी डाॅ. पूजा जरांगे, मुलगा शिवराज, अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक पाटील , आप्पासाहेब कुढेकर आणि शेकडो मराठा सेवक आले आहेत. डॉ. अमोल खांडे, डॉ.अभिमन्यू माकणे ,डॉ.उमेश काकडे आणि डॉ.विनोद चावरे यांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांच्या रक्ताच्या तपासण्या आणि सोनोग्राफी तपासणी करण्यात आली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button