ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-महाराष्ट्रात श्री.छ.खा.उदयनराजेंचा जलवा….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

महाराष्ट्रात श्री.छ.खा.उदयनराजेंचा जलवा….

सातारा दि: एकादी व्यक्ती ही अनुभव व पदामुळे मोठी ठरते. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज व युवकांचे आयडॉल श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता व त्यांचा करिष्मा आजही कायम आहे. वयाची अर्धशतक पूर्ण करूनही आपल्या धाडसी- बेधडक स्वभावामुळे महाराष्ट्रात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचाच जलवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे तसे विद्याविभूषित व प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत . नशिबाने पायाशी सुख सुविधा व राजेशाही संपत्ती असूनही सामान्य माणसाची नाळ जोडणाऱ्या या नेत्यांनी नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री अशी घटनात्मक पदे भूषवलेले आहेत. आजही भाजप नव्हे तर महायुती राज्यसभेचे खासदार म्हणून ते कार्यरत आहेत. पण, आपल्या स्वभाव गुणधर्मानुसार ताट मानेने लोकसभेमध्ये म्हणजेच नवीन संसद भवन मध्ये जाण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारणामध्ये विरोधकाचे नाव घेऊन त्यांना मोठे करायचे नाही. हा संकेत सर्वच पार्टीत अगदी सोशल मीडिया वर एखादी बातमी अभ्यासपूर्ण असली तरी त्याबाबत प्रतिक्रिया देणे अनेक जण टाळतात. या पाठीमागे हेच प्रमुख कारण आहे की संबंधित लिखाण करणारे यांचा मोठेपणा आपणास मनाला वेदनादायक ठरतो. पण, राजकारणामध्ये कसलेले पैहलवान असलेले आदरणीय जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी सातारा येथे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. उत्तर देताना त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलला कॉलर उडवली.
खरं म्हणजे कॉलर पर्यंत जाण्याचे धाडस फक्त वडीलकीच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबच करू शकतात. ते इतर येड्या गबाळ्याचे काम नाही. श्री छ खा उदयनराजे काहींच्या स्वप्नात येतात. उदयनराजे शिवाय त्यांचं पान हालत नाही. श्रीमती छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जेवढे सातत्याने नाव घेतले जाते. तेवढे साक्षात काही जण श्रीरामाचे सुद्धा नाव घेत नाही. ही काहींच्या बाबतीत अनेकदा स्पष्ट झाली आहे. आणि याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. अगदी प्रश्न दुष्काळाचा जरी असला तरी त्यांचे नाव…. अतिवृष्टी झाली तरी त्यांचेच नाव ..असे एक खिडकी योजना साताऱ्यात राबवली जात आहे. या पाठीमागे उदयनराजेंच्या करिष्मा व त्यांनी केलेले काम हे अधोरेखित होत आहे.
प्रत्येक माणसाचे समाधान करणे हे राज्यकर्ते म्हणून कुणालाही शक्य नाही. आणि अशा वेळेला काही लोक व्यक्तिगत स्वार्थापोटी नाराज होतात. त्यांची नाराजी दूर करणे. हे जरी शक्य असले तरी काही वेळेला काही गोष्टींकडे दुर्लक्षित केल्यामुळे ती पुन्हा लक्षात राहत नाही. .तशा पद्धतीने उदयनराजे भोसले हे अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि हा त्यांचा स्वभाव अनेकांना आवडत असल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढू लागलेली आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली येथे जाऊन त्यांनी भाजप नेते व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. खरं म्हणजे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे सर्व वरिष्ठ नेते हे उमेदवारी निश्चित करण्यामध्ये जीवाचे रान करत आहे. अशावेळी प्रत्येक मिनिट हा पक्षाच्या भवितव्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे तिसऱ्या- चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या बाबत अगदी शांत डोक्याने विचार करणे क्रमप्राप्त आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे दिल्लीत गेल्यानंतर त्यांची चांगल्या पद्धतीने उठा बस झाली होती . त्यांना ताटकळ ठेवण्याचे धारिष्ट कुठलाच नेता करू शकत नाही. महाराष्ट्राचे सध्याचे भाजपचे किंगमेकर देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे आधी भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्या भेटीतून त्यांना भाजपची उमेदवारी मिळेल. हे निश्चित केले पण ज्येष्ठनेतेश्री पवारसाहेब यांनी अजूनही सस्पेन्स ठेवलेला आहे. या मध्ये बरंच गोष्टींचा उलगडा झालेला आहे. शेवटी राजकारणामध्ये कुणी कुणाचे शत्रू अथवा मित्र नसतात. राजकारण यालाच म्हणतात.
हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे पाहिले तर नक्कीच जाणवते. सध्या उदयनराजे भोसले यांच्या करिष्मा व त्यांची वाढलेली आपट लोकप्रियता एवढेच नव्हे तर मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सुद्धा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारामध्ये जीव तोडून काम करत आहे. एक मराठा लाख मराठा असे बोलून कुणबी मराठा दाखला घेत असले तरी कुणबी मराठा सुद्धा ओ.बी.सी. बी.सी, अल्पसंख्याक यांच्या समवेत उदयनराजे भोसले यांना दिल्लीमध्ये सन्मानाने पाठवण्यासाठी आतुर झालेली आहेत. त्यामुळेच तर प्रत्येक साताऱ्यात घडणाऱ्या गोष्टींमध्ये कधी पेढे इतकी चव आता उदयनराजे भोसले यांच्या राजकीय कारकिर्दी बाबत गाजू लागलेले आहे. आणि याला सत्ताधारी पक्षांपेक्षा व्यक्तिगत विरोध असणारे सुद्धा हातभार लावत आहे. असं भाग्य फक्त श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनाच लाभलेले आहे. त्यांच्या या गोष्टीबद्दल अनेकांना नवल वाटत आहे. अनेकांची रोजी रोटी सुद्धा उदयनराजे या शब्दावर चालत असते. काहींची दुकानदारी सुद्धा याच शब्दामुळे चालत आहे. शेवटी उदयनराजे भोसले यांच्या शिवाय पान हालत नाही. याची मात्र इतिहासात नोंद झालेली आहे. हे नवा पिढी कधी विसरणार नाही. त्या अर्थाने उदयनराजेंचाच जलवा आजही कायम आहे. हे विरोधक सुद्धा मोठ्या मनाने सार्वजनिक व खाजगी जीवनातही मान्य करतात.
——————————————————————-
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button