मायणी:-पैलवान भारत मदने ने जिंकली एक लाख 51 हजार ची कुस्ती.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पैलवान भारत मदने ने जिंकली एक लाख 51 हजार ची कुस्ती.
मायनी प्रतिनिधी___मायणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त स्फूर्ती क्रीडा मंडळामार्फत भरण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यात भारत मदने बारामती यांनी 50 व्या मिनिटात पैलवान कीर्ती काटे कर्नाटक केसरी यास गुणावर मात करून कुस्ती जिंकली भारत मदने यांनी कुस्तीतील कौशल्य व चपळाई दाखवून उपस्थित आमची मने जिंकली या आखाड्यात नामवंत मल्लांच्या प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या त्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारने फीटले यावेळी बोलताना डॉक्टर.येळगावकर म्हणाले की या आखाड्यास तीस वर्षाची परंपरा आहे या आखाड्यात कुस्ती शौकीन सामान्य नागरिक वर्गणी देतात त्यामुळे येथे नुरा कुस्ती हा प्रकार नाही तसेच काही कुस्ती शौकीन स्वतः कुस्ती लावतात यामध्ये रामचंद्र दादा काबुगडे राजेंद्र ज्ञानू काबुगडे आनंदा शेवाळे अंकुश रजपूत यांनी स्वतःच्या खिशातून कुस्त्या लावल्या सागर तामखडे कोल्हापूर विरुद्ध सचिन केचे या कुस्तीत सागर तांबडे यांनी घिसा डावावर मैदान मारले तर राहुल कोरडे यांनी आपल्या कौशल्याने अविनाश गावडे याला चिटपट केलेपैलवान दशरथ तामखडे यांनी गुडापा दावणगिरी यास पाच मिनिटात आसमान दाखवले आदित्य ठोंबरे यांनी केवळ दोनच मिनिटात प्रतिस्पर्धी गोरख जाधव यास मोळी डावावर चितपट केली वेदांत साळुंखे महिने याने चांगली कुस्ती केली तर प्रज्वल कदम यांनी चांगला पट काढून पैलवान अण्णा मदने आसमान दाखवले व रोखतीस हजाराचे बक्षीस मिळवले तर राहुल पाटोळे यांनी उमेश पोलेकर या चित्तपटकरून वाहवा मिळवली या आखाड्यात 200 पेक्षा अधिक लहान मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या यामध्ये उत्तम कचरे तानाजी डांगे सुभाष फडतरे महादेव ढवळे उत्तम यलमर मोहन दगडे हरिभिशे दाजी जायगावकर रवी सूर्यवंशी सुनील माने बापू पाटोळे भगवान देशमुख यांनी पंच म्हणून काम केले या आखाड्यास महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन महाराष्ट्र केसरी तसेच नामवंत पैलवान. या नी. भेट दिली या आखाड्यात जागतिक ढोलकी पटू राजू सुखदेव घोलप याचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सुखदेव घोलप यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास युवा नेते सचिन गुदगे महादेव यलमर मजीद नदाफ महेश पुस्तके दिलीप देशमुखे शिवाजी माळी जनार्दन देशमुख मानसिंग देशमुख अभिजीत देशमुख सुशांत देशमुख येळगावकर ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाराम कचरे यांनी आभार मानले