पुणे:-२६/११ च्या निमित्ताने दिव्यांग भारतीय सैनिकचे पुणेरी पगडीने सन्मान.
प्रतिनिधी रफिक शेख कात्रज पुणे:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
२६/११ च्या निमित्ताने दिव्यांग भारतीय सैनिकचे पुणेरी पगडीने सन्मान.
पुणे, दि. 26 (रफिक शेख ) : २६ /११ च्या भयानक अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले सैनिक व पोलिसांना श्रद्धांजली अर्पित करून हवालदार बसवराज पट्टनशेट्टी यांची आज पुणेरी पगडी देऊन धानोरी येथे खास सन्मानपूर्वक कौतुक करण्यात आले.
शासकीय दिव्यांग कल्याण कमिटीचे विशेष सदस्य, पॅरा टार्गेट शूटिंग असो.चे अध्यक्ष व प्रहार चे प्रसिद्धी प्रमुख रफीक खान यांचे निवास्थान दिशा दर्शक बोर्डचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. प्रहारचे पुणे शहर अध्यक्ष अभय पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व त्यांच्या हस्ते हवालदार बसवराज पट्टणशेट्टीचे पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आले.
बसवराज हे कर्नाटक राज्यातील भारतीय सैनिक आहेत, गरीब घराण्यातून १२वी पर्यंत शिकून भारतीय हवाई सेनेत भरती झाले, नाशिकच्या ग्याडा मिसाईल सेन्टर मध्ये ट्रेनिंग घेत असताना अचानक कारगिल च्या युद्ध सुरू झाल्याने त्यांची बदली जम्मू काश्मीरला झाली,तिथून LOC ( लाईन ऑफ कंट्रोल) वर त्यांना पाठवण्यात आले, ३ वर्ष तिथे देशाची रक्षा करून पंजाबला बदली झाली, नंतर २००५ जम्मू काश्मीरला त्यांची बदली झाली व पुंच भागात ११ अगस्ट २००५ च्या पहाटे ४ च्या वेळात अतिरेक्यांनी त्यांच्या बटालियनवर हल्ला केला व यात त्यांच्या डाव्या पायाला ३ गोळ्या लागली पण यांनी ३ गोळ्यांच्या रूपांतर ३ अतिरेकीच्या जीव घेऊन बदला घेतला.
२०१९ ला त्यांना पुण्याच्या खडकी मध्ये कुईन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्पुटरच्या कोर्ससाठी ते आले व सध्या या अवस्थे मध्ये सुद्धा देशाची एक भारतीय सैनिक म्हणून सेवा करीत आहेत.