ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी मध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी : गरजूंना अन्नधान्य व फळे वाटप.

प्रतिनिधी खलील मुलाणी खटाव:-8600942800

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

प्रतिनिधी खलील मुलाणी खटाव.

मायणी मध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी : गरजूंना अन्नधान्य व फळे वाटप.

दि.22 (प्रतिनिधी):मायणी ता.खटाव येथे

भारताचे प्रथम मिसाइल मैन तथा शहीद ए वतन फतेह अली खान हजरत टीपू सुल्तान(र.अ.) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . हजरत टीपू सुल्तान जयंती उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने नियमावली तथा कायदा सुव्यवस्थचे पालन करून साजरी करण्यात आली.या वेळी मुस्लिम समाजाचे प्रवक्ते मा.नावाजभाई तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितित हजरत टीपू सुल्तान यांचे प्रतिमे ला पुष्पहार अर्पण करुन खिराज ए अकीदत सादर करण्यात आली तसेच हजरत टीपू सुल्तान यांचे विचारधारेचा ऊपस्थितांना परिचय करून देण्यात आला.

मा.नावाजभाई तांबोळी म्हणाले जयंती अशी साजरी झाली पाहिजे की त्यातून काहीतरी जनसामान्य जनतेला काहीतरी आर्थिक लाभ घर उपयोगी साहित्य, शैक्षणिक साहित्य ,त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व रुग्णांना फळे वाटप असा फायदा झाला पाहिजे तरच ते जयंती झाल्यासारखे वाटेल त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने आर्थिक दुर्बल असलेल्या काही घटकांना किराणा वाटप व मेडिकल कॉलेज वरील असलेले रुग्ण त्यांना आरोग्यासाठी उपयुक्त अशी फळे नारळ पाणी देण्यात आली आहे .तरी इथून पुढे ही जयंती ही साध्या पद्धतीने इतरांना मदत होईल अशी साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावेळी रिजवाण नदाफ,झाकीर नदाफ,अरबाज नदाफ,सलमान नदाफ ,साहिल नदाफ आलम बागवान, वसीम मुल्ला रमीज नदाफ ,साद बागवान मुवाज बागवान ,सईद बागवान साजिद जमादार, विशाल चव्हाण मंगेश भिसे, फिरोज मुलाणी,उपस्थित होते.झाकीर नदाफ यांनी आभार व्यक्त केले.

( मायणी मध्ये टिपू सुलतान जयंतीनिमित्त फळे  व किराणा वस्तू वाटप करताना मुस्लिम समाज व इतर—)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button