पुणे पिंपरी:-चिंचवडगावात ओपन जिमचे शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
चिंचवडगावात ओपन जिमचे शंकर जगताप
यांच्या हस्ते लोकार्पण.
पिंपरी, दि. 21 (शफिक शेख):- चिंचवड गावठाण येथील श्री गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये ओपन जिम आणि व्यायामाचे इतर साहित्य बसवण्यात आले आहे. या ओपन जिमचे माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
शंकर जगताप म्हणाले, “सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायाम हवा असतो. कोरोनाच्या संकटाने संपूर्ण मानवजातीलाच सदृढ शरीराचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे. निरोगी आयुष्य जणू सर्वांसाठीच महत्वाचे बनले आहे. नागरिकांना आपल्या घराच्या बाहेरच व्यायामाचे साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीथून ओपन जिम उभारण्यात आले आहे. ओपन जिम ही संकल्पना सर्वांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे. ओपन जिम हे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी देखील महत्त्वाचे आहे. त्याचा सोसायटीतील प्रत्येकाने आनंद घ्यावा. इथल्या साहित्याची कुणाकडून नासधूस होणार नाही याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले.”
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, अजित कुलथे, धनंजय शाळिग्राम, विजय गावडे, प्रमोद पाटील, राजेश येवलेकर, नितीन पवार, गणेश थोरात, आण्णा भोसले, दीपक परकाळे, शंकर देशमुख, दीपक पराठे तसेच सोसायटीमधील रहीवाशी व कार्यकर्ते उपस्थित होते.