ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-16 नोव्हेंबर रोजी मायणीत मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार.

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
 पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

16 नोव्हेंबर रोजी मायणीत मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार.

चोराडे प्रतिनिधी . मायणी दिनांक 16 नोव्हेंबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेली 14 वर्षे प्रयत्नशील असणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गुरुवार दिनांक 16 नोव्हेंबर खटाव तालुका दौऱ्यावर येत असून मायणी येथे जरांगे पाटील यांची भव्य जाहीर सभा होणार आहे ते या सभेत काय मार्गदर्शन करणार याची उत्सुकता लागली असून त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती मायणी मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवार( दि. 16 ) जरांगे पाटलांची या दौऱ्यातील पहिली सभा 10 वाजता दौंड येथे असून तेथून सुमारे 140 कि. मी अंतरावर मायणी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे या प्रवासादरम्यान अन्य कोठेही सभा नाही मायणी व परिसरातील मराठा कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी त्यांनी भरपूर वेळ दिला असून त्यांचा त्या दिवशी मायणी येथे मुक्काम असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क दौऱ्याला मागणी पासून प्रारंभ करण्याचा शब्द जरांगे पाटील यांनी दिला होता सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे या सभेसाठी मायणी -चितळी रस्त्यावरील अकॅडमी मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, आदी जिल्ह्यातून सुमारे 2 लाख मराठा बांधव येण्याची शक्यता आहे 30 हेक्टर जमिनीवर लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सभा परिसरात स्वतंत्र पार्किंग आहे मायणी ग्रामपंचायत मार्फत पाणी व्यवस्था, आरोग्य विभाग खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार असून रुग्णवाहीका, अग्निशमन दलास पाचारण करण्यात येणार आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button