माळेवाडी:-(श्रीरामपूर)-गुरुकुल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रतिक्षा संजय पगारे प्रथम क्रमांकावर.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

गुरुकुल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रतिक्षा संजय पगारे प्रथम क्रमांकावर.

माळेवाडी / श्रीरामपूर (RPS स्टार न्युज प्रतिनिधी )श्री संत जनार्दन स्वामी संस्कार संस्था वेरूळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या गुरुकुल शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज वेरूळ येथे घोषित करण्यात आला. अनेक गावच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. माळेवाडी येथील सुद्धा 62 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले
गट 1ली ते 4थी गटामध्ये
प्रथम क्रमांक-प्रतीक्षा संजय पगारे
द्वितीय क्रमांक-स्वरा सुनील रसाळ व आराध्या काकासाहेब औताडे
उत्तेजनार्थ क्रमांक-आराध्या संतोष हाडके
गट 5वी ते 7वी मध्ये…
प्रथम क्रमांक-सोहम भरत ओमने
द्वितीय क्रमांक-श्रावणी रामेश्वर तारडे, आराध्या चंद्रकांत चाबुकस्वार व प्रज्वल रामेश्वर औताडे, आर्बिया तपर शेख , आरुही सचिन वमने या पाच विद्यार्थ्यांना सारखेच गुण मिळाल्याने पाचही जणांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
तृतीय क्रमांक-वेदिका संतोष गायकवाड
गट 9वी ते 12वी…
प्रथम क्रमांक-कृष्णा बाबासाहेब ठाकरे
द्वितीय क्रमांक-शिवम निवृत्ती औताडे व आराध्या जालिंदर औताडे
तृतीय क्रमांक-दिव्या सोमनाथ नेहे.
तसेच ओम संदीप पवार या विद्यार्थ्याने ज्या गावोगावी परीक्षा झाली त्यातून संस्थेच्या वतीने टॉपर 41 विद्यार्थी निवडले गेले. त्यात त्यांनी स्थान मिळवले. त्याचा विशेष सत्कार लवकरच करण्यात येणार आहे.
या सर्वांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी त्यांच्या त्यांच्या शाळेत करण्यात येणार आहे. या सर्वांचे जगद्गुरु श्री स्वामी शांतिगिरी महाराज यांनी विशेष कौतुक केले. तसेच ब्र. रामानंद महाराज व समन्वयक काळोखे साहेब यांनीही कौतुक केले.
तसेच श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिनकर ढोबळे यांनी विशेष अभिनंदन या विद्यार्थ्यांचे केले. व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उद्या सर्व माळेवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक यांना बक्षीस वितरण करणार आहेत




