चिंचवड पोलिसांच्या मेहनतीने एका आईला तिचा मुलगा मिळाला.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
चिंचवड पोलिसांच्या मेहनतीने एका आईला तिचा मुलगा मिळाला.
चिंचवड, दि. 11 (शफिक शेख):- भोंडवे नगर वाल्हेकरवाडी येथून दि. 10 रोजी बेपत्ता झालेल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला शोधून तिच्या आईच्या हवाले करण्यात चिंचवड पोलिसांना यश आले आहे. यामध्ये मोलाची कामगिरी करणारे पोलीस उपनिरीक्षक वेंकट पोटे यांचे विशेष आभार परिसरातील नागरिकांकडून आणि बेपत्ता मुलाच्या पालकांकडून मानले जात आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांचा 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा दि. 10 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून बेपत्ता होता. तो मिळून येत नसल्यामुळे त्या मुलाच्या आईचा जीव कासावीस झाला होता. त्यामुळे त्यांनी रात्री 12.40 वाजता चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये मुलगा हरवल्याची तक्रार दिली. सदर प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत पोलिस उपनिरीक्षक श्री. पोटे यांनी ताबडतोब आपली तपासाची चक्रे फिरविली आणि लवकरात लवकर त्या मुलाला शोधून त्याच्या आईच्या हवाले करण्याचा चंग बांधला. पूर्ण दिवसभर सर्वत्र चौकशी करून आणि आवश्यक ती पूर्ण मेहनत घेवून अखेरीस दि. 11 च्या दुपारपर्यंत त्या मुलास शोधून त्याच्या आईच्या हवाले केले. या पूर्ण कारवाईत पीएसआय नलवडे साहेब आणि पोटे यांच्या सहका-यांनी त्यांना मदत केली.