ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-तुम्हाला अपेक्षित उत्तर मी देणार नाही – उद्योगमंत्री उदय सामंत.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

तुम्हाला अपेक्षित उत्तर मी देणार नाही – उद्योगमंत्री उदय सामंत.

पिंपरी, दि. 8 (शफिक शेख):- कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात मिळकतकर न भरू शकलेल्या छोटया उद्योजकांना मिळकतकरावर महानगरपालिकेतर्फे जो शास्ती कर आकारला गेला ज्यामुळे आधीच आर्थिकदृष्टया कंबरडे मोडलेल्या लघु उद्योजकांना दिलासा म्हणून ही मनपा शास्ती कर माफीसाठी आपण काही करणार आहात का, असे आमचे प्रतिनिधींनी विचारले असता ‘‘तुम्हाला अपेक्षित असलेले उत्तर मी देणार नाही’’, असे सांगत उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी लहान उद्योजकांच्या समस्यांकडे पाठ फिरविली.
चिंचवड येथील अॅटो क्लस्टर येथे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी श्री. सामंत हे पिंपरी चिंचवड येथे आले होते. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी काही कारणास्तव नियोजित पत्रकार परिषद रद्द करून भेटीदरम्यान अगदी थोडया काळात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळेस मोठया उद्योगधंद्यांशी निगडीत विकासासाठी श्री. सामंत यांनी आपले सरकार हे विविध विकास प्रकल्प करीत असल्याचे सांगितले. यावेळेस त्यांना छोटया उद्योजकांच्या समस्यांविषयी काही पावले उचलणार आहात का, असे विचारले असता त्यांनी सांगितले की वेळीच त्याचे आम्ही नियोजन करू. मिळकतकरावरील मनपा शास्ती कर माफी संदर्भात विचारले असता तो विषय इन्कम टॅक्स विभागाचा आहे त्यात आम्ही काही करू शकणार नाही, असे श्री. सामंत म्हणाले. परंतु शास्ती करावर जास्त भर दिल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, तुम्हाला अपेक्षित उत्तर मी देणार नाही. अशाप्रकारे मोठया उद्योगांना वाढविण्याच्या प्रयत्नांत जो लघुउद्योजक आहे त्याच्या समस्यांकडे काणाडोळा करण्यात आला.
यावेळेस भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, बाळासाहेबांची शिवेसेनेचे युवासेना प्रमुख विश्वजित बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे आदी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button