ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:- मायणीत चौंडेश्वरीचेभव्य मंदिर उभारणार,__डॉक्टर दिलीप येळगावकर.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मायणीत चौंडेश्वरीचेभव्य मंदिर उभारणार,__डॉक्टर दिलीप येळगावकर.

मायणी प्रतिनिधी___सध्याचे सरकार हे विकासाचे सरकार असून या सरकारकडून निधी प्राप्त होतात आपण चौंडेश्वरी चे भव्य मंदिर उभारणार असल्याची ग्वाही खटाव यांची माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली मायणी येथील चौंडेश्वरी मंदिर वॉल कंपाऊंड भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होती याप्रसंगी सरपंच सचिन गुदगे देवांग समाजाचे अध्यक्ष विजयराव कवडे सचिव राजू बाबर नानासाहेब दिवटे रमेश बाबर राहुल बाबर आनंदराव शेवाळे विलासराव सोंमदेज्ञानेश्वर दिवटे तानाजी माने नितीन झोडगे नितीन पडळकर राजाराम कचरे नंदकुमार पुस्तके प्राध्यापक दिलीप पुस्तके यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात येळगावकर पुढे म्हणाले की मी आमदार असताना मायणीला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून घेतला असून चौंडेश्वरी मंदिरासाठी मी जास्तीत जास्त निधी प्राप्त करून घेणार आहे तसेच सरुताई मठामध्ये गोशाळा भक्तनिवास भव्य सभागृ हअशा सोयी उपलब्ध करून देणार आहे मायणी तलावात टेंभूचे पाणी आल्याने पाच दशकाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे समाधान मला आहे या पाच वर्षात ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची दखल शासनाने घेतलेली आहे सरपंच युवा नेते सचिन गुदगे यांनी सांगितले की आम्ही गेल्या पाच वर्षात रस्ते गटारी पिण्याच्या पाण्याची योजना यशस्वीपणे राबवल्या असून येत्या काही दिवसात 24 बाय सात ही योजना लवकरच कार्यान्वित करत आहोत चौंडेश्वरी मंदिराच्या या जागेची कुठेही नोंद नव्हती आम्ही ती नोंद करून घेतली आता मी पाच लाखाचा निधी दिला आहे पुढील काळात अधिक सात लाखाचा निधी देणार आहोत तरी चौंडेश्वरी च्या भक्तांनी कोष्टी समाजाने आम्हाला आशीर्वाद द्यावा ही विनंती यावेळी राजू बाबर अरुण चोथे नानासाहेब दिवटे यांनी आपली मनोगतेव्यक्त केली. पांडुरंग तारळेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button