पुणे पिंपरी:-स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये अव्वल येण्यासाठी ‘पीसीएमसी’तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन.
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये अव्वल येण्यासाठी
‘पीसीएमसी’तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन.
पिंपरी, दि. 5 (शफिक शेख):- स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये देशात पिंपरी चिंचवड शहर अव्वल स्थानावर यावे यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या वतीने लघुफिल्म, गीत, पोस्टर/चित्रकला, शिल्प/भित्ती चित्र आणि पथनाटय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा प्लास्टिक बंदी, कचरा विलगीकरण, परिसर स्वच्छता, ३आर- रिड्यूस, रीयुज, रिसायकल (कमी वापर, पुनर्वापर, पुर्नचक्रीकरण) या विषयावर आधारित असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत अभियानामध्ये सर्व घटकांतील नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविणे तसेच माहिती, शिक्षण आणि संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने जनजागृती करणे हा स्वच्छ सर्वेक्षणाचा हेतू आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी खालील बाबी प्रामुख्याने माहितीस्तव .
1. लघुफिल्म(short film) साठी SBM Cell (sbm2020@pcmcindia.gov.in) येथे ४/११/२०२२ ते १४/११/२०२२ कालावधीत दि. २०/११/२०२२ पर्यंत SBM Cell ला सादर करणे.
2. गीत(Jingal) साठी SBM Cell (sbm2020@pcmcindia.gov.in) येथे ४/११/२०२२ ते १४/११/२०२२ कालावधीत दि. २०/११/२०२२ पर्यंत SBM Cell ला सादर करणे.
3. चित्रकला, शिल्प, पथनाट्य साठी संबंधीत क्षेत्रिय कार्यालय येथे ४/११/२०२२ ते १४/११/२०२२ कालावधीत दि. २०/११/२०२२ पर्यंत संबंधीत क्षेत्रिय कार्यालयात सादर करणे.
प्रत्येक स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड केली जाणार आहे. सहभागी स्पर्धकांनी आपण कोणत्या स्पर्धेत सहभागी झालेले आहात हे विषयात नमूद करावे. स्पर्धक हा पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असावा. लघुफिल्म किंवा गीत हे ३ मिनिटांपेक्षा पेक्षा जास्त नसावे. स्पर्धेतील कलेकरीता येणा-या खर्चाची जबाबदारी स्पर्धकाची वैयक्तीक असेल. मोबाईलव्दारे चित्रित केलेले लघुफिल्म किंवा गीत स्विकारले जातील. सदर स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धेतील कलेमध्ये पिंपरी चिंचवड शहराचे नाव येणे अनिवार्य आहे. स्पर्धकांनी त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, वॉर्ड क्रमांक, ई-मेल, स्पर्धेचे नाव, स्पर्धेचा विषय आदी माहिती द्यावी. या स्पर्धेतील विजेत्यांना कोणत्याही स्वरूपाचे रोख बक्षिस देण्यात येणार नसून महापालिकेच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे स्वच्छ भारत समन्वयक तथा सहायक आयुक्त विनोद जळक यांनी दिली आहे.