ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-फलटणला मराठा आरक्षण आध्यादेशाची होळी : ओबीसींमधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध.

पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

फलटणला मराठा आरक्षण आध्यादेशाची होळी :
ओबीसींमधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध.

 

मलटण :
२६ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाकडून सगेसोयरे संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती या आधीसुचनेला विरोध करत  फलटण तालुका संघर्ष समिती ने आज पुकारलेल्या मोर्चाला ओबीसींनी प्रचंड साथ देत घोषणांनी फलटण शहर दणाणून सोडले नाना पाटील चौक येथे मराठा आरक्षण आधिसूचनेची होळी आंदोलकांकडून करण्यात आली व तीव्र शब्दात सरकारला इशारा देण्यात आला
ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना फलटण प्रांतकार्यालयात तसेच , आमदार दिपक चव्हाण तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन ओबीसीं मधून मराठा आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला
सकाळी दहा वाजता संत सावतामाळी मंदिर नाना पाटील चौक येथून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ,महात्मा फुले चौक मार्गे प्रांतकार्यालयात पोहचला यावेळी फलटण तालुक्यातून तमाम ओबीसी बांधव सामील झाले होते ओबीसींच्या घोषणांनी फलटण शहर दणाणून सोडले
प्रांतकार्यालय फलटण येथे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी निवेदन स्विकारले विधानपरिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आमदार दीपक चव्हाण यांनी निवेदन स्विकारले ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यात येईल अशीच सरकारची पहिल्या पासून भावना आहे ओबीसींच्या भावनाचा आदर नक्की केला जाईल असे त्यांनी सांगितले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर यांनी निवेदन स्विकारले या वेळी फलटण तालुक्यातील हजारो ओबीसी बांधव उपस्थित होते

आधिसूचनेची होळी
ओबीसी आंदोलकांकडून नाना पाटील चौक येथे मराठा आरक्षण आधिसूचनेची होळी करण्यात आली ‘सगेसोयरे ‘
या व्याख्येला विरोध करत संतप्त जमावकडून शासन व शिंदे सरकार विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या.

आ संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत ओबीसी नेते मंत्री छगनराव भुजबळ यांच्या विषयी खालच्या भाषेत केलेल्या भाष्याचा विरोध या वेळी आंदोलकांकडून करण्यात आला.

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button