क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे कोंढवा:-सहा.पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

कोंढवा, दि. 31 (शफिक शेख):- चार्जशीटमध्ये मदत करण्यासाठी आणि फिर्यादी यांच्या आई व बहिणीला अटक न करण्यासाठी कोंढवा पोलीस स्टेशनच्या सहा. पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे आणि पोलीस शिपाई अभिजीत पालके यांच्यावर लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोंढवा पोलीस ठाण्यात येथील तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांवर दाखल गुन्हयाच्या चार्जशीटमध्ये मदत करण्यासाठी आणि फिर्यादी यांचे आई, वडिल व बहीण यांना अटक न करण्यासाठी पोलीस शिपाई अभिजीत पालके यांनी फिर्यादी यांच्याकडे तडजोडीअंती 50 हजार रूपये लाचेची मागणी केली होती.
फिर्यादी यांनी याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली असता ला.प्र.वि. पुणे चे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांनी तपासाअंती असे आढळून आले की कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अभिजीत पालके यांनी फिर्यादी यांच्याकडे 50 हजार रूपये लाचेची मागणी केली आणि सहा.पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांनी पालके यांना यामध्ये सहकार्य केले. त्यानुसार श्री. निंबाळकर यांनी दोघांविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7, 7अ आणि 12 नुसार गुन्हा दाखल केला.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उपायुक्त/पोलीस निरीक्षक श्री. राजेश बनसोडे, ला.प्र.वि. पुणे परीक्षेत्र आणि मा. पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव ला. प्र. वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
शासकीय अधिकारी/कर्मचारी /लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास खालील नमूद क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्री. राजेश बनसोडे यांनी केले.
हेल्पलाईन क्रमांक 1064
अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे – 02026122134, 02026132802, 02026050423
व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – 7875333333
व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – 9930997700
ईमेल आयडी पुणे – dyspacbpune@mahapolice.gov.in
वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन अॅप तक्रार – www.acbmaharashtra.net.in

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button