नवी मुंबई वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने नवी मुंबई ते पुणे चालणारी अवैद्य खाजगी प्रवाशी वाहतूक.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
नवी मुंबई वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने
नवी मुंबई ते पुणे चालणारी अवैद्य खाजगी प्रवाशी वाहतूकीवर कारवाई होणे बाबत.
1)वाशी ट्राफिक शाखेच्या हाकेच्या अंतरावर असणारी खाजगी वाहतूक
2) खारघर वाहतूक शाखेच्या बाजूला.
3) सी बी डी बेलापूर वाहतूक शाखेच्या बाजूला
4 ) मॅक्डोनाल कलंबोली समोर बस स्थानकापासून 200 मी अंतरावर मनाई असताना राजरोसपणे चालणारी वाहतूक.
5) जुईनगर रेले स्थानकासमोर व नॅशनल हायवेवर
6) नेरुळ ब्रिज खाली इ. वरील सर्व ठिकाणाहून अवैद्य प्रवासी वाहतूक राजरोसपणे चालू आहे. यावर वाहतूक शाखेचे अधिकारी कारवाई का करत नाहीत?
नवी मुंबई:- वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने चालणारी मुंबई पुणे खाजगी अवैद्य प्रवासी वाहतूक. सानपाडा स्टेशन समोरील मुख्य रोड अंतर्गत ब्रिज खालील युटर्न जागेमध्ये बेकायदेशीर खाजगी वाहनांनी केलेले वाहन तळ वाहतूक शाखेच्या आशीर्वादानेच चालू असल्याचे स्पष्ट होत आहे. या खाजगी अवैद्य प्रवाशी वाहतुकीमुळे शासकीय परवाना प्राप्त वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाचा महसूल बुडवून खाजगी बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक राजरोसपणे चालू आहे. या खाजगी अवैद्य प्रवाशी वाहतुकीशी वाहतूक शाखेचे काय संबंध आहेत? असा रोखठोक सवाल प्रवाशी वर्गातून होत आहे. खाजगी अवैद्य प्रवाशी वाहतूक कोणाच्या जीवावरती छाती ठोक प्रवाशी वाहतूक करत आहे? याला कोणा कोणाचा वरदहस्त आहे? याचे चित्र स्पष्ट झालेले आहे. ज्या लोकांनी शासकीय परवाना महसूल भरून वाहन खरेदी केलेले आहेत , तेही अशी वाहतूक करत नाहीत. अशाप्रकारे खाजगी अवैद्य प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांकडून मोठा अपघात होऊन प्रवाशांचे जीविताची हानी होण्याची वाहतूक यंत्रणा वाट बघत आहे का? असा प्रकार घडला तर वाहतूक प्रशासन जबाबदारी घेणार का? असे कित्येक प्रश्न प्रवाशी वर्गातून विचारले जात आहेत. या प्रश्नाचे उत्तरे वाहतूक प्रशासनाला लवकर द्यावे लागतील. या प्रश्नाचे उत्तर देण्यास वाहतूक प्रशासन सज्ज आहे का? असल्यास लवकरच वाहतूक प्रशासनाला मीडियासमोर यावे लागेल.