मायणी परिसरात तुफान पावसाची बॅटिंग___बळीराजा वैतागला.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मायणी परिसरात तुफान पावसाची बॅटिंग___बळीराजा वैतागला.
मायणी प्रतिनिधी मायणी परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी कडक सूर्यप्रकाश होता परंतु अचानक पाच वाजता विजेच्या कडकटासह म्हणून वरूणराजाने बॅटिंग सुरू केल्याने ओढ नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले तर शेतात गुडघाभर पाणी उभे राहिले आहे सलग परतीच्या पावसाने थैमानघातलेअसून आता रब्बी हंगाम पेर उगवणार नाही व ज्याने पेर केला आहे तो पेर पाण्याखाली बुडून गेला आहे तो आता कुजून जाणार आहे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर थैमान घालू लागलेआहे संपूर्ण रानात चिखल आणि पाणी झाल्याने रानातील शेतीची कामे ठप्प झालेत त्यामुळे रोजगार करणाऱ्या सर्वसामान्य गरिबांना रोजगार उपलब्ध नसल्याने उपासमारीची वेळ आली म्हणतात ना आई जेवू. घालीना व बाप भीक मागून देईना अशी अवस्था निर्माण झाली