ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-कराड तहसील कार्यालयातील लिफ्ट बंद असल्याने वयोवृद्ध लोकांचे व अपंग लोकांचे हाल.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड:-8421223931

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
कराड तहसील कार्यालयातील लिफ्ट बंद असल्याने वयोवृद्ध लोकांचे व अपंग लोकांचे हाल होत असून त्यांना पायऱ्या चढून विविध कार्यालयात जाताना दमछाक होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून प्रत्येक वेळी आंदोलने निवेदन देऊनच लिफ्ट चालू होणार का? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे. लोकांकडून सूचना झाल्या की तात्पुरत्या स्वरूपात लिफ्ट चालू होते नंतर जैसे ती परिस्थिती असल्याने नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने या बंद असलेल्या लिफ्ट लवकरात लवकर सुरू करून नागरिकांचे हाल थांबवावेत अशी मागणी होत आहे.