ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ; शिंदे कुटुंबासह शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश.

पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ; शिंदे कुटुंबासह शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश.

पश्चिम भागातील सामाजिक-राजकीय जीवनात ठळक ओळख असलेले लोकनेते बापूसाहेब शिंदे, युवा नेते विकास शिंदे आणि प्रविण शिंदे यांच्यासह पश्चिम भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री आ. मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे पश्चिम भागातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. शिंदे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांचा मजबूत जनाधार लक्षात घेता, येणाऱ्या काळात स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वेळी आ. मकरंद पाटील यांनी नव्या प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच विकासकामे, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षप्रवेश सोहळ्याला पश्चिम भागातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2) ज्येष्ठ नेतृत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश.

ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री. चंद्रकांत ढमाळ यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला. श्री. ढमाळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, तसेच वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणून कार्यरत होते. यासोबतच ते खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना, खंडाळा येथे संचालक पदाची जबाबदारीही सांभाळत आहेत.
सातत्यपूर्ण जनसेवा, मजबूत संघटन कौशल्य आणि व्यापक राजकीय अनुभव असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाल्याने सातारा जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक बळकट होणार असल्याचे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा प्रवेश आगामी काळातील राजकीय वाटचालीस नवी दिशा देणारा आणि निर्णायक टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीस चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button