पुणे:-हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुकीसाठी वाहतूक मार्ग जाहीर.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त
मिरवणुकीसाठी वाहतूक मार्ग जाहीर.
पुणे, दि. 8 (शफिक शेख):- पुणे वाहतूक पोलीस उप आयुक्त यांनी आज हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणा-या मिरवणुकीसाठी वाहतूक मार्ग खुला करून देण्यात आला असून नागरिकांसाठी मार्ग मोकळा करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
याबाबत बोलताना पुणे वाहतूक पोलीस उप आयुक्त श्री. राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, दिनांक 9/10/2012 रोजी हजरत मोहम्मद पैगंबर (ईद-ए-मिलाद) यांची जयंती आणि कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी येत असल्याने मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ई-ए-मिलाद ची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होणार असून मनुशाह मस्जिद नाना पेठ पुणे या ठिकाणाहून सुरू होते. या मिरवणुकीमध्ये ट्रक, जीप, रिक्षा इ. चा वापर होत असल्याने सदर ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीपणे चालावी यासाठी श्रीरामे यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
मिरवणुकीचा मार्ग हा मनुशाह मस्जिद 482 नाना पेठ येथून सुरू होवून संत कबीर चौक, ए. डी. कॅम्प, भारत सिनेमा, पदमजी पोलीस चौकी चौक, निशाद सिनेमा, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, मुक्ती फौज चौक, डावीकडे वळून गावकसाब मस्जिदीचे मागून बाबाजान दर्गा चौक, चारबावडी पोलीस चौकीचे पाठीमागून शिवाजी मार्केट ते सेंटर स्ट्रीट रोडने उजवीकडे वळून भोपळे चौक, गावकसाब मशिदीसमोरून मुक्तीफौज ते पुलगेट चौक, डावीकडे वळून एम. जी. रोडने, कोहिनूर चौक, महावीर चौक, डावीकडे वळून साचापीर स्ट्रीटने महात्मा फुले चौक, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना सिनेमा ते हमजेखान चौक, डावीकडे वळून गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळून सुभानशाह दर्गा चौक, सिटी जामा मस्जिद शुक्रवार पेठ पुणे येथे सांगता या भागातील मिरवणूक पुढे जाईल तसे वाहतुकीचे व परिस्थितीनुसार व आवश्यकतेनुसार तेथील वाहतूक (फायरब्रिगेड, पोलीस वाहने व रूग्णवाहिका वगळून) बंद केली जाईल. त्याप्रमाणे वाहनचालकांनी पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. श्रीराम यांनी केले आहे.