वाई:-किसन वीर महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
किसन वीर महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
वाई: येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये “शोध निबंध लेखन” या विषयावर अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महिला सबलीकरण कक्ष व संशोधन आणि विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सदरची कार्यशाळा तीन सत्रांमध्ये पार पडली. कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी केले. प्रथम सत्रात कला शाखेचे उपप्राचार्य व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनिल सावंत यांनी “शोध निबंधाचे घटक” या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. विनोद वीर होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. वीर यांनी कार्यशाळेचे महत्त्व विशद केले.
दुसऱ्या सत्रामध्ये हिंदी विभागप्रमुख डॉ. भानुदास आगेडकर यांनी “शोध निबंधासाठीचे स्त्रोत साहित्य” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे होते.
तिसऱ्या सत्रामध्ये प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी “सेटिंग ऑफ व्हेरिएबलस ॲण्ड हायपोथेसिस” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. रविंद्र बकरे होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक महिला सबलीकरण कक्षाच्या समन्वयक डॉ. मंजुषा इंगवले यांनी केले. आभारप्रदर्शन दिपाली चव्हाण तर सूत्रसंचालन रेश्मा मुलाणी, डॉ. दमयंती चौधरी, दिपाली पाटील व स्वाती देशमाने यांनी केले. यावेळी अग्रणी विभागाचे समन्वयक श्री. भिमराव पटकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेस वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.