कराड:-वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये नवरात्रनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये नवरात्रनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
कराड: (दि. ३, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडचे, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे नवरात्रनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थिनी मंडळामार्फत करण्यात आले. वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे विद्यार्थिनींच्या विविध कलागुणांना विकसित करण्यासाठी त्यांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून विद्यार्थिनी मंडळ व सचेतन मंडळ कार्यरत आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थिनी मंडळामार्फत बुधवार, दि. 28 सप्टेंबर रोजी मेहंदी स्पर्धा व केशरचना स्पर्धा, गुरुवार दि. 29 सप्टेंबर रोजी एकपात्री अभिनय स्पर्धा, शुक्रवार दि. 30 सप्टेंबर रोजी पाककला स्पर्धा, शनिवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. त्याचबरोबर एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये भारतातील व महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा इ. क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखांचे सादरीकरण केले. मेहंदी व केशरचना स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व कराड येथील मेकअप आर्टिस्ट श्रीमती रेणू कोळी व श्रीमती प्राजक्ता शिरगावे यांनी परीक्षण दिले. आणि विद्यार्थिनींना मेहंदी, केशरचना व मेकअप आर्टिस्ट क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या “भोंडला व दांडिया” या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ. प्रिती प्रकाश पाटील, कराड यांच्या शुभ हस्ते व श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराड, उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री प्रकाश पांडुरंग पाटील (बापू ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
“या उपक्रमाच्या माध्यमातून आपले पारंपारिक सण व उत्सव यांची माहिती विद्यार्थिनींना होते आणि यातूनच विद्यार्थिनींना सकारात्मक ऊर्जा मिळून उमेदीने आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते.” असे मनोगत आपल्या शुभसंदेशामध्ये मा. सौ. प्रिती प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी “आजचा समाज हा पूर्वीसारखा पितृसत्ताक नसून स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा व स्त्री प्रधान सत्तेच्या दिशेने वाटचाल करणारा आहे आणि स्त्रियांनी सर्वच क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.” असे प्रतिपादन मा. श्री प्रकाश पाटील (बापू ) यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये नवरात्रानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे, उपप्राचार्य प्रा. आर. ए. कांबळे, प्रा. डॉ. आर. आर. थोरात यांनी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनी मंडळाच्या निमंत्रक प्रा. श्रीमती आर. एस. पाटील, प्रा. श्रीमती एस. पी. पाटील, प्रा. श्रीमती एस. डी. पाटील, प्रा. श्रीमती डॉ. एम. ए. शिंदे, प्रा. श्रीमती एस. सी. भस्मे, प्रा. श्रीमती डॉ. व्ही. आर. लोंढे, प्रा. श्रीमती एम.एम. चव्हाण, प्रा. श्रीमती एस. आर. पाटील, श्रीमती प्रा. एन. एस. देसाई व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला. कार्यक्रमात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.