ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी :-शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी संस्थेचे पाचशे कोटी व्यवसाय करण्याची उद्दिष्टे.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी संस्थेचे पाचशे कोटी व्यवसाय करण्याची उद्दिष्टे.

मायणी प्रतिनिधी_शिवप्रताप मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेत संस्थेचे 22 23 या आर्थिक वर्षात 500 कोटीचा एकत्रित व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी दिली आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की तारणापेक्षा कारणाला महत्त्व देऊन ही संस्था पुढे जात आहे महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाला कमीत कमी व्याजदराने कर्ज देण्याची सुविधा केली आहे त्याचप्रमाणे घरबांधणी घरच दुरुस्तीसाठी कर्ज योजना सुरू केली असून सर्वसामान्य लोकांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले तसेच लवकरच आम्ही खटाव तालुक्यातील वडूज येथे 17 वी शाखा उभारणार आहोत असेही त्यांनी सांगितले मायणी येथील संस्था शाखेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते ते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सपकाळ तसेच मायनीचे प्रथम नागरिक सचिन गुदगे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती शाखेचे व्यवस्थापक सतीश कोकाटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या शाखेत सहा कोटी 81 लाखाच्या ठेवी असून चार कोटी पन्नास लाख कर्ज वाटप केले आहे जास्तीत जास्त बचत गटांना कर्ज वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच समाजकारणातही ही शाखा अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले नंतर आपल्या भाषणात दिलीप पुस्तके यांनी सांगितले की केवळ नफा मिळवणे हा या संस्थेचा उद्देश नसून तळागाळातील जनसामान्यांना सक्षम करणे तसेच तारणापेक्षा कारणाला महत्व देऊ सभासदाची कल्याण साधने हा उद्देश आहे यानंतर झालेल्या भाषणात युवा नेते सचिन गुदगे यांनी सांगितले की या संस्थेचे अध्यक्ष प्रताप शेठ दादा साळुंखे यांचे नाव गोल्ड विश्वात अग्रेसर आहे त्यामुळे त्यांनी चांगले सभासद चांगली माणसे चांगले कर्मचारी जोडले आहेत त्यामुळे संस्था प्रगती प्रथावर आहे असे सांगितले त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक उत्तम उत्तमराव घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वर्धापन दिनास हसनमुल्ला चंद्रकांत लोखंडे महादेव महादेव महामुनी इब्राहिम तांबोळी सौ उर्मिला येळगावकर पल्लवी गुदगे सौ नंदा चेन्नई राजकुमार काबुगडे बाबासो थोरवे महेश पुस्तके आबा भोसले प्रल्हाद घोलप महादेव काबुगडे सीमा पाटील विनायक काबुगडे सुरेश तुपे तसेच सभासद हितचिंतक ठेविदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी सतीश कोकाटे यांनी आभार मानले मायणी नगरीचे प्रथम नागरिक युवा नेते सचिन गुदगे यांचा सत्कार करताना कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे व शिवाजीराव माने छायाचित्र दिसत आहेत

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button