कराड :-प्रचिती महिला बचतगट पार्ले यांचे तर्फे मोफत महिलासाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
प्रतिनिधी विनोद पाटील कराड :-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रचिती महिला बचतगट पार्ले यांचे तर्फे मोफत महिलासाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
पार्ले, ता.कराड,जि.सातारा येथील प्रचिती महिला बचतगट पार्ले यांचे वर्धापनदिनानिमित्त धन्वंतरी क्लिनिक ॲन्ड हेल्थ केअर सेंटर बनवडी यांचे तर्फे शुक्रवार दिनांक ३०.०९.२०२२ रोजी समाजमंदिर पार्ले येथे मोफत महिलासाठी आरोग्य तपासणीचे आयोजन केले होते.त्यावेळी सर्व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, व इतर आजाराचे मार्गदर्शन डॉ.सौ.प्रतिभा कणसे यांनी केले.यावेळी लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये पहिला नंबर कु. रसीका संदीप मदने,दुसरा नंबर कु.अक्षरा विकास नलवडे व अश्विनी लव मदने,तिसरा नंबर कु.करण तानाजी नलवडे यावेळी पार्ले गावचे सरपंच सौ.अश्विनी विजय मदने, प्रचिती बचतगट अध्यक्ष सौ.सुनिता लव मदने,सचिव सौ.वैशाली विनोद काशिद, उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.मिनाक्षी प्रदीप पाटील यांनी केले.आभार जयश्री विकास नलवडे यांनी मानले. यावेळी सौ.कल्पना विकास पाटील, सौ.अनिता मदने,अंगणवाडी सेविका सौ.मिनाताई नलवडे व श्रीमती सुनंदा भास्कर पाटील यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.