राहता :-लोहगाव मध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042.
लोहगाव( वार्ताहर )राहता तालुक्यातील लोहगाव येथील बाळासाहेब कारभारी चेचरे यांच्या गोठ्यातून रात्रीच्या वेळी बिबट्याने शेळी ठार करून पलायन केले. या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे बिबट्याला लपण्यास जागा आहे .बिबट्याच्या दर्शनाने या परिसरात शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळतात गेले अनेक दिवसा पासून या परिसरात बिबट्याची वास्तव्य आहे .आज शेळीठार केली उद्या गायावर देखील हल्ला करू शकतात या परिसरात मुक्त गोठ्यामुळे प्रत्येक मळ्यामध्ये गाया साठीशेळ्यांचे साठी मुक्त गोठे केले आहे शेतीबरोबर जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन करतात. एकीकडे लम्पी आजाराने शेतकरी चिंतातून झालेला आहे. तर दुसरीकडे बिबटेच्या जास्तीने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे. तरी संबंधित विभागांनी या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात जोर धरून आहे. तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या परिसरात इंदिरा लावा अशी मागणी होत आहे.