राहता :-नांदूर्खी बु.गावात अंगणवाडीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात.प्रहारचे वसंतराव पा.काळे यांचा आंदोलनाचा ईशारा.
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर :-9767653309

राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
नांदुर्खी बु.गावातील गावठाण हद्दीतील मराठी शाळेतील अंगणवाडी क्रमांक ५१ या ठिकाणी पावसाचे गुडघाभर पाणी साचते व लहान मुलांना अंगणवाडीमध्ये त्यामुळे जाताही येत नाही.व् त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.ती सर्व गोरगरीबांची मुले आहेत.ग्रामपंचायतने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना आजपर्यंत कुठलीही उपाययोजना केली नाही.बाकीच्या गावात आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जातात.परंतु आपल्या गावात खूप वेगळी परिस्थिती का आहे.याकडे लवकरात लवकर ग्रामपंचायतने लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. लवकरात लवकर जर अंगणवाडी ची मागणी मान्य केली नाही तर आम्ही प्रहार संघटने मार्फत् आमच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने पुढे हे काम करण्याकरता प्रयत्न करनार आहोत.तरी लवकरात लवकर ग्रामपंचायतने गावच्या लोकांची मागणी मान्य करावी हि नम्र विनंती.