औरंगाबाद:-१९६ गनर्स दिवस ९७ तोपखाना ब्रिगेड औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरा.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
दि. 28/09/2022
१९६ गनर्स दिवस
प्रत्येक वर्षाला २८ सप्टेम्बर ला गनर्स दिवस साजरा केला जातो. ह्या वर्षाला ही १९६ गनर्स दिवस ९७ तोपखाना ब्रिगेड औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भूतपूर्व सैनिकांनी केलेला त्याग, परिश्रम आणि कष्टाला वंदना करण्यासाठी १६९ मध्यम तोपखाना रेजिमेंट द्वारे व ९७ तोपखाना ब्रिगेड च्या मार्गदर्शनाने सम्पूर्ण महाराष्ट्रभरात माजी सैनिकांची रैली चे आयोजन करण्यात आली होते. ह्या रैली ची सुरवात औरंगाबाद छावनी मध्ये झाली व १० दिवस, १४ ठिकाणी कार्यक्रम आणि सम्पूर्ण ३६ जिल्हाच्या भुतपूर्व सैनिकांशी जोडुन रैलीचा सांगाता समारोह चा कार्यक्रम २८ सप्टेम्बर २०२२ रोजी सर्वत्र हॉल येथे करन्यात आला. या कार्यक्रम सैन्यदलातील सर्व अधिकारी तसेच पदाधिकारी व आजी-माजी सैनिक कुटुंबासह भरपुर संख्येत उपस्थित होते. तसेच १९७१ च्या युद्धात आपले कर्तब दाखवणारे कॅप्टन. सुरेंद्र सुर्वे व भारत मातेच्या सौरक्षनार्थ शहीद झालेल्या जवानाच्या वीरमाता व वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. रैलीमध्ये काही स्टॉल/असिस्टन्स बूथ उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा सैनिक वेल्फेर चे प्रतिनिधी, इ.सि.एच.स. चे प्रतिनिधी, स्टेशन सेल औरंगाबाद, श्री गजानन वर्कफोर्स प्रा लि., शौर्य अकॅडमी, वनविभाग चे प्रतिनिधी सर्व बैंक चे प्रतिनिधि, विमा कम्पनी, दोन आणि चार चाकी गाडी कम्पनी, आर्मी रिक्रूटिंग ऑफ़िस चे प्रतिनिधी, यूनिट रन कैंटीन चे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. रैली नंतर आलेल्या सर्व मान्यवरांसाठी भोजनाची सोय केली होती. या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य करणारे तसेच सैनिकांच्या हितार्थ खंबीरपणे सदैव उभे असणारे वेगवेगळ्या संघटनेचे माजी सैनिक उपस्थित होते.