खटाव:-मायणी येथील औंधकर मठात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मायणी येथील औंधकर मठात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
मायणी प्रतिनिधी—-अंधारात योग्य दिशा दाखवणारे, अपयशाचे रूपांतर यशात करणारे, जीवनातील प्रत्येक समस्येत मार्गदर्शन करणारे गुरुच असतात अशा गुरूंचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुवारी 10 रोजी गुरुवंदना व गुरु पौर्णिमा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सकाळी सात ते नऊ या कालावधीत श्री मुनी महाराज यांच्या समाधीस श्री रघुनाथ माळी यांच्याकडून रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर दहा ते बारा आनंदा माळी व त्यांच्या सहकार्याकडून सामूहिक भजनाचा कार्यक्रम करण्यात आला दुपारी बारा वाजता लिंगकय षटस्थल ब्रह्मी गुरु गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली यावेळी मठाचे शार्दुल स्वामी, भोगेंद्र कपाळे, योगेश स्वामी यांनी सर्व विधी व्यवस्थित पार पाडला या गुरुपौर्णिमा व गुरुवंदना या कार्यक्रमास मायणी येथील लिंगायत वाणी, लिंगायत माळी, सर्व लिंगायत समाज, इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी शार्दुल स्वामी यांनी उपस्थितांचे आभार मानले.