कराड:-श्री शिवाजी हायस्कूल, कराड येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्री शिवाजी हायस्कूल, कराड येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र.
कराड:- डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी हायस्कूल, कराड येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम क्विक हील फाउंडेशनच्या “सायबर शिक्षासाठी सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराडच्या सायबर शक्ती क्लबमार्फत घेण्यात आला.
या कार्यक्रमात सायबर वॉरियर्स प्रथमेश खंडागळे व पद्मनाभ माळवदे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा विषयक सविस्तर मार्गदर्शन केले. सत्रात इंटरनेट व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, वैयक्तिक व आर्थिक माहितीचे संरक्षण, सोशल मीडिया धोके, फसवणूक करणाऱ्या लिंक व अॅप्सची ओळख, तसेच ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी या विषयांवर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वास्तव जीवनातील उदाहरणे, प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तर सत्राद्वारे डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सजगतेची जाणीव निर्माण झाली असून, अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनात सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारण्याची तयारी व्यक्त केली.
या उपक्रमाचे प्रभावी मार्गदर्शन क्लब प्रकल्प समन्वयक डॉ. प्रियांका शिंदे यांनी केले. तसेच श्री शिवाजी हायस्कूल, कराडचे मुख्याध्यापक जाधव टी. डी सर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
आयोजकांच्या मते, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात सायबर सुरक्षा ही केवळ पर्याय नसून आवश्यकता आहे, आणि अशा सत्रांमुळे भविष्यातील डिजिटल भारत अधिक सुरक्षित होईल.