वडूज:-ब्रह्माकुमारी रक्तदानासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड करणार.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
ब्रह्माकुमारी रक्तदानासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड करणार.
मायणी प्रतिनिधी —–ब्रह्माकुमारीज् मार्फत होणाऱ्या रक्तदान महाअभियानात होणार एक लाख युनिट रक्तदान.
१७ ऑगस्ट रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा करतील रक्तदान महाअभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ.
ब्रह्माकुमारीज रक्तदानासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणार.
देशभरातील सहा हजार सेवा केंद्रांवर होणार रक्तदान शिबिरे मध्ये माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त अभियान राबविण्यात येणार.
वडूज(प्रतिनिधी) ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी (२५ ऑगस्ट २०२५) व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने संस्थेतर्फे भारतासह नेपाळात रक्तदान महाअभियान राबवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात येणार आहे. या महाअभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय शुभारंभानंतर भारत व नेपाळात रक्तदान शिबिरांना सुरुवात होईल. त्यानंतर देशभरातील सहा हजारांहून अधिक सेवा केंद्रांवर एकाच वेळी दि. २२, २३, २४ आणि २५ ऑगस्ट रोजी विशाल रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. या अभियानांतर्गत एक लाख युनिट रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे.
समाज सेवा प्रभागाचे राष्ट्रीय संयोजक बी. के. अवतार भाई यांनी सांगितले की, ब्रह्माकुमारीजच्या समाज सेवा प्रभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या महाअभियानासाठी भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, जिल्हा रक्तपेढी, जिल्हा सरकारी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, रोटरी इंटरनॅशनल क्लब, लायन्स क्लब, आयएसबीटीआय यांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर रक्तदान शिबिरे घेतली जातील.
एक लाख युनिटसह वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न या रक्तदान महाअभियानांतर्गत एक लाख युनिट रक्तदानाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने ब्रह्माकुमारीज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करणार आहे. हा पहिलाच प्रसंग आहे की एखाद्या आध्यात्मिक संस्थेमार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान अभियान राबवले जात आहे. जागतिक विक्रमसाठी तयारी पूर्ण झाली आहे.
गुगल मॅपद्वारे होणार शिबिरांची मॉनिटरिंग समाज सेवा प्रभागाचे मुख्यालय संयोजक बी. के. वीरेंद्र भाई यांनी सांगितले की, ज्या सेवा केंद्रांवर रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील, त्यांची मॉनिटरिंग गुगल मॅपद्वारे केली जाईल. यासाठी एक गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये रक्तदानाचे ठिकाण, वेळ, दिनांक, गुगल मॅप, रक्तदात्यांची संख्या, सेवा केंद्र प्रमुखाचे नाव, सहयोगी संस्थांची नावे आदी संपूर्ण माहिती भरली जात आहे, जेणेकरून रक्तदान महाअभियानानंतर डेटा संकलन सुलभ होईल. महाराष्ट्रातही विविध सेवाकेंद्रामार्फत भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. सोमनाथ वडनेरे, राज्य माध्यम समन्वयक, ब्रह्माकुमारीज् यांनी सांगितले.
वडूज येथील स्थानिक सेवाकेंद्रामार्फत रक्तदान कार्यक्रम दि. 24 ऑगस्ट, 2025 रोजी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र, शांताई पार्क,पेडगाव रोड, वडूज येथे राबविण्यात येणार असल्याचे सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी राणी दीदी यांनी सांगितले.