आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई :-युवकांनी माहिती अधिकार कायदा समजून घ्यावा. – मा. जावेद आतार.

प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

युवकांनी माहिती अधिकार कायदा समजून घ्यावा.
– मा. जावेद आतार.

वाई, दि. २८: माहिती अधिकार कायदा हा भारतीय नागरिकांचा हक्काचा कायदा आहे. अण्णा हजारे यांच्या संघर्षातून तो जनतेला मिळाला आहे. तो गावातील घरा-घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रथम महाविद्यालयीन युवकांनी तो कायदा समजून घ्यावा. असे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सातारा जिल्ह्याध्यक्ष जावेद आतार यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत उदघाटक म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी श्री. संदीप पवार, ॲङ विजय जमदाडे, राकेश कांबळे, सचिन दळवी, संदीप गाढवे यांची उपस्थिती होती.
आतार म्हणाले, माहितीचा अधिकार कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यानंतर आपल्या देशातील इतर राज्यांनी तो कायदा स्वीकारला. या कायद्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकही शासनाकडून माहिती मिळवू शकतो. त्यांनी आपल्या भाषणातून एखादी माहिती न दिल्यास व माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते अशी माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले, एन.एस.एसचे स्वयंसेवक व एन.सी.सीचे छात्र समाज आणि महाविद्यालय यांना जोडणारा दुवा आहेत. तुम्हाला ही माहिती देण्याचा उद्देश म्हणजे आपण ती समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवू शकता. माहितीच्या अधिकाराचा वापर करुन समाजाचे हित कसे जोपासावे यासाठी अशा कार्यशाळांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी
डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले. डॉ. अरुण सोनकांबळे यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास
श्री. मनोज शिंदे, स्वाती देशमाने, निलम भोसले माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे वाई तालुका कार्यकारीणीचे सर्व सदस्य, एन.एस.एस. व एन.सी.सीचे स्वयंसेवक व छात्र बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button