मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
राहाता पंचायत समितीच्या वतिने नविन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती अनुदानासह विविध योजना राबविल्या जात असुन याचा लाभ घेण्याचे अवाहन पंचायत समिती राहाता चे कृषि विस्तार अधिकारी श्री. मदन शेवाळे यांनी केले आहे. त्यांनी माहिती देंताना सांगितले की अनुसुचित जाती, नवबौद्ध व आदिवासी शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाच्या वतिने विविध योजना राबविण्यात येत आसतात. त्यामध्ये या योजने अंतर्गत नविन विहिर करणे, जुनी विहिर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंंपसंच, इले.मोटार, विज जोडणि आकार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन सेटवर नव्वद टक्के आनुदान, पि.व्ही.सी. पाईप अशा विविध योजनेसाठी अनुदान सुरु आसुन यासाठी mahadbt पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असुन, याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा तसेच या विषयी अधिक माहितीकरिता कृषीविभाग पंचायत समिती राहाता यांच्याशी संपर्क साधन्याचे आवाहन मदन शेवाळे यांनी केले आहे.