वाई : किसन वीर महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वाई : किसन वीर महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
२४ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात मागासवर्गीय स्थायी समिती, समान संधी केंद्र व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने “जात वैधता प्रमाणपत्रासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सादर करावयाचे प्रस्ताव,” या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वाती इथापे, उपायुक्त तथा सदस्य, जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा श्री. नितिन उबाळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी मार्गदर्शन केले, यावेळी प्रभारी प्राचार्य, प्रा. डॉ. सुनील सावंत, प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, डॉ. भानुदास आगेडकर, डॉ. चंद्रकांत कांबळे, कनिष्ठ विभागाचे उप्रपाचार्य श्री. राजेंद्र शिंदे कार्यालय अधिक्षक श्री. रघुनाथ शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वाती इथापे म्हणाल्या, जातवैधता प्रमाणपत्राला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. बारावी सायन्स नंतर नीट व सीईटीची परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ह्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जातवैधता प्रमाणपत्र नसेल तर विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामधून ऑनलाईन अर्ज भरावेत व आपल्या कागदत्रांची पडताळणी समन्वयकांकडून करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. नितिन उबाळे म्हणाले, दि. १७ सप्टेंबर २०२२ ते ०२ ऑक्टोंबर २०२२ हा कालावधी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा म्हणून राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्राची स्थापना झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्राचे तसेच इतर फॉर्म भरताना अडचणी येऊ नयेत, यासाठी समन्वयकांनी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. कोणताही लाभार्थी विद्यार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालयांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. सुनील सावंत म्हणाले, आमचे महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच दक्ष असते. ही कार्यशाळा आमच्या महाविद्यालयात घेण्याची संधी दिल्याबध्दल त्यांनी समाज कल्याणच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आमच्या महाविद्यालयात समान संधी केंद्र कार्यक्षम असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य करीत असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मागासवर्गीय स्थायी समितीचे समन्वयक डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी, तर पाहुण्यांचा परिचय समान संधी केंद्राचे समन्वयक डॉ. भानुदास आगेडकर यांची करुन दिला. मान्यवरांचे आभार विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. अरुण सोनकांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य श्री. राजेंद्र शिंदे कार्यालय अधिक्षक श्री. रघुनाथ शेलार किरण शिंदे, जितेंद्र चव्हाण व सचिन शिंगटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील समन्वयक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.