मानखुर्द:- घरातच हुबेहूब नोटांची छपाई करणारा पोलिसांच्या जाळ्यात.
प्रतिनिधी अच्छेलाल जैस्वार मानखुर्द:-9930703482

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मानखुर्द:- घरातच हुबेहूब नोटांची छपाई करणारा जाळ्यात.
मुंबई :-पोलिसांनी 50, 100 आणि 200 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला शनिवारी अटक केली. रोहित शहा (22) वर्षे असे या तरुणाचे नाव असून मानखुर्द येथील घरातच तो या नोटांची छपाई करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून
सात लाखांपेक्षा अधिक किमतीच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. रोहित याने या आधी किती बनावट नोटा वितरित केल्या याचा तपास सुरू असल्याचे मानखुद पोलिसांनी म्हटले आहे. परिसरातील संशयास्पद व्यक्ती यांच्या हालचालींवर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वतीने बारकाईने नजर ठेवली जाते. गुन्हे प्रकटीकरण पथकातील कॉन्स्टेबल केदार आणि मीर यांना परिसरात बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने सोनापूर मधील डुक्कर चाळीत असलेल्या दुमजली घरात छापा टाकला. वरच्या मजल्यावर रोहित शहा हा लॅपटॉप आणि प्रिंटर च्या साह्याने नोटा छपाईचे काम करीत असल्याचे दिसून आले. 50, 100 आणि 200 रुपयांच्या नोटा प्रिंटिंग करून त्याने घरामध्ये ठेवल्या होत्या. पोलिसांनी या सर्वांची गणती केली असता त्याचे मूल्य सात लाखांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.
या छपाई रॅकेटमध्ये रोहित एकटा सक्रिय आहे की तो नोटा वितरित करण्यासाठी अन्य कोणाची मदत घेतो याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रोहित शहा याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून तो सेल्समन म्हणून नोकरी करतो
फावल्या वेळामध्ये इंटरनेटवर असताना त्याला नोटा छापायची कल्पना सुचली. त्याने लॅपटॉप प्रिंटर आणि वेगळ्या प्रतीचा कागद खरेदी केला आणि नोटांची छपाई करण्यास सुरुवात केली. कमी मूल्याच्या नोटात फार कोणी बारकाईने पाहत नसल्याने रोहित याने 50, 100 आणि 200 च्या नोटांची छपाई सुरू केली.



