पुणे:-इंदोरी शहरातील ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आरोग्य अभियान उत्साहात साजरा.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे पुणे:-9146190215

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे
आज इंदोरी शहरातील ग्रामपंचायत कार्यालय येथे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आरोग्य अभियान
साजरे करण्यात आले..
सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या मार्गदर्शाखाली तसेच इंदोरी शहराच्या विद्यमान उपसरपंच सौ लतिकाताई निलेश शेवकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत कडजाई माता यांची पूजा करून करण्यात आली.प्रथम प्रथमोपचार किट ग्रामदैवत कडजाई माता यांच्या चरणी अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय शशिकांतदादा शिंदे, उपसरपंच सौ लतिकाताई निलेश शेवकर, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्णतात्या पानसरे, दत्ताभाऊ ढोरे, मधुकरभाऊ शिंदे, स्वप्निल दादा शेवकर तसेच महिला ग्रामपंचायत सदस्या सौ जयश्री ताई सावंत, सौ राजश्रीताई राऊत ,सौ धनश्रीताई काशीद ,सौ बेबीताई बैकर,सौ रेश्माताई शिंदे,तसेच माजी उपसरपंच माननीय श्री दिनेशभाऊ चव्हाण ,राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष आशिष भाऊ ढोरे ,राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका युवक उपाध्यक्ष श्री रणजित हिंगे ,राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष ग्रामीण ब्लॉक जितुभाऊ पानसरे ,राष्ट्रवादी काँग्रेस इंदोरी युवक अध्यक्ष विशाल पवार,तसेच आर के फिटनेसचे प्रोप्रायटर राकेश शिंदे ,लॉरेल कंपनीचे कामगार नेते श्री राहुल शेवकर, माळी युवा मंचचे कार्यकर्ते , पै शुभम शिंदे ,पै पुष्कर शेवकर,,पै रोहित शेवकर,तसेच युवा उद्योजक प्रवीण राऊत, गणेश शिंदे, तुषार शिंदे,कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्यांनी पूजन करून करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी सरपंच शशिकांतदादा शिंदे,उपसरपंच लतिकाताई निलेश शेवकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष मा हरिभाऊ पवार, चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक श्री भगवानभाऊ शेवकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा सौ राजश्रीताई राऊत यांचा सत्कार करण्यात आला..
यानंतर उपसरपंच सौ लतिकाताई निलेश शेवकर तसेच उपस्थित मान्यवर यांनी इंदोरी शहरातील सर्व अंगणवाडी,सर्व शासकीय कार्यालये,शहरातील सर्व शाळा आणि सर्व मंदिरे येथे उपस्थित असलेल्या त्यांच्या प्रतिनिधींना प्रथमोपचार किटचे वाटप केले.
प्रथमोपचार किटचे वाटप झाल्यानंतर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इंदुरी शहराचे मा उपसरपंच दिनेशभाऊ चव्हाण, ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष आशिषभाऊ ढोरे, चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक श्री भगवानभाऊ शेवकर तसेच ग्रामपंचायत सदस्य स्वप्निलदादा शेवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले..
तसेच या सर्व मान्यवरांनी सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व महिला आणि पुरुष यांना आवाहन केले की उपसरपंच सौ लतिकाताई निलेश शेवकर यांनी आपल्या कालावधीमध्ये आरोग्य शिबिर, श्रवण यंत्र वाटप तसेच प्रथमोपचार किट वाटप केले तसे आपण सुद्धा आपल्या कालावधीमध्ये अशी विधायक कामे करावीत..
कार्यक्रमाचे आभार सरपंच माननीय श्री शशिकांतदादा शिंदे यांनी केले. तसेच कामगार नेते निलेश मच्छिंद्र शेवकर यांनी भविष्यातील विविध संकल्पना विस्ताराने उपस्थित लोकांना सांगीतल्या. उपस्थित सर्व मान्यवरांनी उपसरपंच लतिकाताई शेवकर आणि सामजिक कार्यकर्ते निलेश शेवकर ह्यांचे त्यांनी राबवलेल्या विविध स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले व त्यांच्या भविष्यातील राजकीय व सामजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदुरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष श्री विशाल अशोक पवार तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री शैलेश शेवकर यांनी केले.