क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे :-मेट्रिमोनिअल साईटवरून ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून निगडीतील पुरूषाची 2,65,000 ची फसवणूक.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

मेट्रिमोनिअल साईटवरून ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून
निगडीतील पुरूषाची 2,65,000 ची फसवणूक
निगडी, दि. 17 (शफिक शेख):- मेट्रिमोनिअल साईटवरून ओळख करून त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांमार्फत प्राधिकरण निगडी येथील एका 44 वर्षीय तरूणाची 2,65,000 रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रणजीत पुरूषोत्तम इंगळे या 44 वर्षांच्या गृहस्थाची ओळख मेट्रिमोनिअल साईटवरून एका मुलीशी ओळख झाली. यानंतर भेटणे झाल्यानंतर त्या मुलीसोबत आणखी एक स्त्री सोबत होती. काही दिवस उलटल्यानंतर सदर स्त्रियांनी संगनमत करून श्री. इंगळे यांना लग्नाचे आमिष दाखवून आणि माइया आईची तब्येत खराब असून उपचारासाठी सुरूवातीस इंगळे यांच्या खात्यावरून 2,25,000 आणि त्यांनतर गूगल पे वरून 40000 रक्कम रूपयांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच श्री. इंगळे यांनी निगडी पोलीस स्टेशन येथे या दोन्ही महिला आरोपींविरोधात तक्रार दिली त्यानुसार निगडी पोलिसांतर्फे भा. द. वि. कलम 420 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. ओमासे हे करीत आहेत.

घरातील व्यक्ती परदेशी गेल्याने खिडकीचे लोखंडी ग्रील उचकटून
कपाटातील सुमारे 7 लाखांचा ऐवज लंपास
निगडी, दि. 17 (शफिक शेख):- प्राधिकरणातील सेक्टर 25 मधील घरातील सर्व लोक परदेशी गेल्याने संधीचा फायदा उचलून दोन अज्ञात चोरटयांनी घराच्या पाठीमागील किचनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील काढून कपाटातील सुमारे 7 लाख रूपये किंमतीचे सोन्याचे, मोत्याचे दागिने आणि टायटन कंपनीचे घडयाळ असा ऐवज लंपास केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की निगडी प्राधिकरण सेक्टर 25 मधील प्लॉट नंबर 141 येथील राहत्या घरातील सर्व व्यक्ती या काही कारणास्तव ऑस्ट्रेलिया येथे गेले आहेत. याचाच फायदा चोरटयांनी घेतला आणि 16 सप्टेंबर रोजी रात्री 3.30 च्या सुमारास घराच्या मागील किचनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील काढून टाकले आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे, मोत्याचे दागिने आणि टायटन कंपनीचे घडयाळ मिळून असा सुमारे 7 लाख रूपयांची ऐवज लंपास केला. घरातील काम करणा-या नोकराने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर निगडी पोलीस स्टेशनमध्ये भादवि 457, 380 आणि 34 नुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत या गुन्हयाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक श्री. शेळके यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तपास सुरू असून सदर घरातील सीसीटीव्ही फुटेज हे तपासले आहेत परंतु आरोपींनी रेनकोट, मास्क आणि कॅप परिधान केल्यामुळे त्यांची ओळख पटणे मुश्किल होत आहे. परंतु लवकरच या प्रकरणाचा तपास लावला जाईल.

वाकड येथील राहत्या घरासमोरील अॅक्टिव्हा चोरीस
वाकड, दि. 17 – येथील थेरगाव गावठाण, जगताप नगर लेन नं 1 येथील राहत्या घरासमोर उभी केलेली 109 सीसी ची काळया रंगाची अॅक्टिव्हा क्रमांक एमएच 14 ईव्ही 5159 चोरटयांनी चोरून नेली आहे. याबाबत गाडीचे मालक दिनकर महादू जाधव यांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी भादवि 379 नुसार अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना ही सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडल्याने चोरटयांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
दिवसाढवळया राहत्या घरासमोरून वाहन चोरील जाणे याला चोरांचे वाढलेले धाडस म्हणावे की त्यांच्या मनातून पोलिसांचा कमी झालेला धाक म्हणावा याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
सदर बाबतीत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गाडे हे करीत आहेत.

चिखली येथून 17 वर्षीय मुलास अज्ञातांनी पळवून नेले
चिखली, दि. 17 – ग्रीन फिल्ड सोसायटी येथील 7 वर्षीय मुलाचे अपहरण आणि खून हे प्रकरण ताजे असतानाच दि. 14 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मोरेवस्ती येथील अष्टविनायक चौक येथून एका 17 वर्षीय मुलाला अज्ञात इसमाने पळवून नेले आहे.
खूप शोधाशोध करूनही जेव्हा या मुलाच्या नातेवाईकांनी त्याचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी याबाबत चिखली पोलीस स्टेशनमध्ये दि. 16 रोजी आपल्या मुलास कोणी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भादवि कलम 363 नुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबतीत सदर प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. बारावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर प्रकरण हे गांभिर्याने हाताळले जात असून लवकरात लवकर या मुलाचा शोध लावण्याचे आणि दोषी आरोपींना पकडण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

5 Comments

  1. आपणास व आपल्या टीमला खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आपल्या कामं हे सर्व सहकारी यांचा पर्यंत पोहोचली अशा प्रकारे प्रयत्न माझे ही चालू आहे तरीही आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा

Leave a Reply to Sachin Ashok Dhumal Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button