वैजापूर :-शिरजगाव तालुका वैजापूर. मलिक वस्ती ते नांदूर मधमेश्वर कालवा रस्त्याची दुरावस्था.
प्रतिनिधी रामकृष्ण भवर वैजापूर:-7499894897

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
- शिरजगाव तालुका वैजापूर. मलिक वस्ती ते नांदूर मधमेश्वर कालवा रस्त्याची दुरावस्था.
प्रतिनिधी. रामकृष्ण पाटील भवर. शिरजगाव
दिनांक 15.9.2022 मलिक वस्ती ते नांदूर मधमेश्वर कालवा हा रस्ता शिरजगाव ते चोरवाघलगाव या मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता आहे पावसामुळे रस्त्यात पाणी साचून मोठाले खड्डे पडले आहेत येथील शाळकरी मुले व शेतकरी यांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्याच्या कामासाठी येथील नागरिकांनी वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार रमेश बोलणारे सर यांच्याकडे कामाची मागणी चार महिन्यापूर्वी केली होती आमदार साहेब यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य करून या कामासाठी तात्काळ मंजुरी देऊन आपल्या विकास निधीतून एक लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आमदार साहेब यांनी गावातील अनेक पानद रस्त्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला आहे.
१) मलिक वस्ती ते नांदूर मधमेश्वर कालवा.१.कि.लो.मिटर. मुरमीकरण.किमत.एक.लक्ष.रु
२) शिरजगाव ते भगूर रस्ता. १.कि.लो.मिटर. मुरमीकरण.किमत.एक.लक्ष.रु
३) शिरसगाव ते मस्की रस्ता.१.कि.लो.मिटर. मुरमीकरण.किमत.एक.लक्ष.रु
४) शिरसगाव ते महालगाव रस्ता.१.कि.लो.मिटर. मुरमीकरण.किमत.एक लक्ष.रू.
५) शिरजगाव ते कौऊटगाव रस्ता १.कि.लो.मिटर. मुरमीकरण.किमत.एक.लक्ष
रू.
या सर्व कामासाठी पाच लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला. व प्रशासकीय मान्यता. कार्यारंभ आदेश शिरजगाव ग्रामपंचायतिकडे गेल्या तीन महिन्यापासून देण्यात आले आहे पावसामुळे या सर्व रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून येथील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे वारंवार कामाची मागणी करत आहे . नानफा.ना.तोटा या तत्त्वावरती हे काम असल्याकारणाने ग्रामपंचायत मात्र नागरिकांना उडवा ऊडविचे उत्तरे देत आहे. गेल्या तीन महिन्यापासून कार्यारंभ आदेश ग्रामपंचायतला प्राप्त होऊन देखील काम होत नसल्याने उपस्थित नागरिक. नारायण पाटील मलिक मोहम्मद पठाण अमोल पाटील भवर प्रमोद पाटील मलिक आदी नागरिकांनी ग्रामपंचायत शिरजगाव बद्दल खेद व्यक्त केला.
प्रतिनिधी. रामकृष्ण भवर शिरजगाव.