ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई तालुक्यातील वेळे येथील महामार्गावर एस.टी च्या धडकेत अपघाती मृत्यू.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वाई तालुक्यातील वेळे येथील महामार्गावर एस.टी च्या धडकेत अपघाती मृत्यू.
दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी एस टी बसणे पादचाऱ्याला धडक दिल्याने नारायण नामदेव जगताप वय:५२ राहणार रणदुल्लाबाद तालुका कोरेगाव यांचे अपघाती निधन झाले आहे. सदर मृत्यु झालेल्या व्यक्तीला कवठे येथील ग्रामिण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी नेण्यात आलेले आहे. सदर मृत्यु व्यक्ती रस्ता क्रॉस करत असताना पुण्यावरून साताराच्या दिशेने येणारे एसटी बस ने धड़क दिल्याने हॉटेल विशालच्या समोर हा अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला असल्याची माहिती समोर आली आहे याचा अधिक तपास भुईंज पोलीस करत आहेत.