वाई:-किसन वीर मध्ये तरुण पंडितचा सत्कार उत्तुंग यशाबद्दल मदनदादांनी केले कौतुक.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

किसन वीर मध्ये तरुण पंडितचा सत्कार
उत्तुंग यशाबद्दल मदनदादांनी केले कौतुक.
वाई : दि. १२ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी तरुण पंडित यांची नुकतीच वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी कौतुक केले. तरूण पंडित हे किसन वीर मधून २०१९ मध्ये भौतिकशास्त्र विषय घेऊन बी.एस्सी. भाग ३ मध्ये महाविद्यालयात प्रथम आले होते.
बावधन ता. वाई सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने असे घवघवीत यश मिळविल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखल्यास असे यश मिळू शकते. किसन वीरच्या या माजी विद्यार्थ्याने स्वयंअध्ययानातून हे यश मिळविल्यामुळे या यशाला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले व तरुण पंडित यांचा आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही घ्यावा असे आवाहन मा. मदनदादा यांनी केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी तरुण पंडित यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार
मा. नारायण चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, श्री. नंदकुमार भोसले व श्री. रघुनाथ शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.