सातारा:-नागठाणे येथील अभय कला क्रीडा गणेशोत्सव मंडळाचा मोफत महाआरोग्य शिबीर उपक्रम.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
नागठाणे येथील अभय कला क्रीडा गणेशोत्सव मंडळाचा मोफत महाआरोग्य शिबीर उपक्रम.
अभय कला व क्रीडा गणेशोत्सवमंडळ EXCELLENT GROUP नागठाणे येथे (धन्वंतरी हॉस्पिटल नागठाणे व श्वास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर)आज घेण्यात आले डॉ घार्गे यांनी मधुमेह थायरॉईड फिट येणे पॅरालेसिस इत्यादी तपासणी व उपचार माहिती दिली तर डॉ किरण घार्गे यांनी लहान मुलांचे सर्व आजार कुपोषण आहारा विषयक सल्ला इत्यादी तपासणी व मार्गदर्शन केले डाॅ माने यांनी शरीरावरील गाठी पोटाचे पित्ताचे आजार मुळव्याध इत्यादी तपासणी व उपचार विषयी माहिती दिली भरपूर प्रमाणात ग्रामस्थांनी व नागठाणे परिसरातील लोकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.किरण बापूसो साळुंखे ,सचिव श्री.राहुल रामचंद्र साळुंखे ,खजिनदार श्री.तुकाराम विष्णू निकम तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच डॉ.सुशीलकुमार घार्गे (एम.डी.मेडिसिन ),डॉ.किरण घार्गे (बाल रोग tadny )डॉ.प्रज्योत माने (जनरल सर्जन विशेष सहकार्य डॉ.नितीनकुमार विलासराव साळुंखे .डॉ.सौ.निशा नितीनकुमार साळुंखे उपस्थित होते