पुणे:-कात्रज चौक म्हणजे मृत्यूचा चौकच….
प्रतिनिधी अब्दुलरहीम शेख पुणे :-8087601074

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
पुणे-कात्रज चौक म्हणजे मृत्यूचा चौकच….
पुणे, दि. 9 (अब्दुलरहिम शेख ) :- पुणे येथील कात्रज चौक हा मृत्यूचा चौक बनला आहे. चारी बाजूला वाहनांची वर्दळीमुळे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करताना हातात मरण धरुनच जावे लागते संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांकडून देण्यात आला आहे.
येथील चौकातून मुंबईकडे जाणार्या काॅर्नरलगत रिक्षा उभ्या असतात शिवाय पुणे मुंबई करणाऱ्या कार याठिकाणी उभारल्याने वाहतूक ठप्प होत असते. जेणे करून मोठे कंटेनर, लोडचे ट्रकमुळे वाहनाची खूपच गर्दी होत असते.
रिक्षा चालकांच्या अरेरावीपणामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे आणि मुंबईला प्रवाशांना घेऊन जाणार्या प्रवासी कारमुळे या काॅर्नरच्या लगत वाहतूक ठप्प होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे जेणेकरून जीवीत आणि वित्त हानी थांबेल.
वेळोवेळी जनतेकडून संबंधितांना विनंतीपूर्वक सांगूनही आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समजते. तरी याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे जेणेकरून जीवीत व वित्तहानी थांबेल अशी मागणी जनसमुदायातून केली जात आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांकडून देण्यात आला आहे.